घरमुंबईमहापौरांच्या वॉर्डाची मनसेकडून पोलखोल

महापौरांच्या वॉर्डाची मनसेकडून पोलखोल

Subscribe

मनसे कार्यकर्त्यांनी महापौरांच्याच वार्डातील अस्वच्छता दाखवल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगताना दिसणार आहे.

महानगरपालिका शहराला पायाभूत सोयीसुविधा पुरवत आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महापौरांवर असते. शहराचे आरोग्य, स्वच्छता, नाले, रस्ते हे व्यवस्थित असावे, यासाठी महापौरांनी प्रयत्न करायचे असतात. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या बाबतीत मात्र वेगळाच प्रसंग घडत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी खुद्द महापौरांच्या वार्डाला टार्गेट करत पोलखोल मोहीम सुरू केली आहे. महापौराच्या वॉर्डात पसरलेली अस्वच्छता, उघडे नाले, ठिकठिकाणी जमलेले कचऱ्याचे ढिग, घरांमध्ये शिरलेले पाणी याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत महाडेश्वराची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मंगळवारी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ गोखले पुल कोसळ्याची दुर्घटना घडल्यानंतर महापौरांनी आपली जबाबदारी झटकली होती. मुंबईत पाणी साचते याला कारण म्हणजे मुंबईत पडणारा जास्त पाऊस असल्याचे महापौर म्हणाले होते. मुबंई महापालिका प्रभावीपणे काम करते, असा दावा महापौरांनी केला होता. त्यांच्या दाव्याची मनसेने पोलखोल केली आहे. सांताक्रूझ पूर्व येथील महापौरांच्या वॉर्ड क्रंमाक्र ८७ मध्ये सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे. याचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून महापौरांच्या वक्तव्यांची खिल्ली उडवण्याचा प्रत्यन सुरू केला आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत पुन्हा एकदा जुंपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

मनसेचे कार्यकारणी सदस्य अखिल चित्रे यांनी हे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ‘उघडा डोळे, पहा नीट’ असा सल्ला महापौरांना दिला आहे. आम्ही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला असून महापौरांनी आपला वॉर्ड आधी सुधारून दाखवावा असे आव्हान दिल्याचे अखिल चित्रे यांनी सांगितले. या फोटोतन महापौराच्या वॉर्डातील दुर्गंधी करणारे कचऱ्याचे साम्राज्य, पावसाळ्यात गटारावर झाकण गायब, रस्त्यावर खड्डे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

मनसेच्या या सोशल मीडिया कॅम्पेनवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. मला यावर बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया महापौरानी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -