मोर्चासाठी मनसेची तयारी, सोमवारी पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक

मनसे

पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून आलेल्या मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे मोर्चा काढणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर आता या मोर्चासाठी मनसेने तयारी देखील सुरू केली आहे. या मोर्चा कशा पद्धतीने असेल याची माहिती देण्यासाठी आणि मोर्चाचे नियोजन करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे. वांद्रे येथील रंग शारदा येथे ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीला मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. तसेच या बैठकीत मोर्चा नंतर मनसेची पुढची रुपरेषा देखील ठरवण्यात येणार आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे महाअधिवेशनात

देशाच्या इतर भागातून सरळ लोक देशात घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लीम बाहेर काढले पाहिजे. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असे म्हणच राज ठाकरे यांनी येत्या ९ फेब्रुवारीला मनसे आझाद मैदानात सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढणार अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती.