Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी तुम्ही घर सोडू नका, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो - राज ठाकरे

तुम्ही घर सोडू नका, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो – राज ठाकरे

राज ठाकरेंनी दिला पोलिसांच्या कुटुंबीयांना आधार

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील समांतर मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णकुंजवर गेल्या काही दिवसात मुंबईच्या डबेवाल्यांपासून ते वारकरी समाजानेही हजेरी लावली होती. पण आपल्या घराशी संबंधित असलेल्या व्यथा मांडण्यासाठी आज खुद्द पोलिस पत्नींनीच राज ठाकरेंची वेळ घेतली. पोलिस कुटुंबीयांना घरे सोडण्यासाठी दबाव आणणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसांच्या अर्धांगिनी गुरूवारी राज ठाकरेंच्या भेटीला आल्या होत्या. पोलिसांच्या घरावर दडपशाही करत पोलिस कुटुंबीयांनी घरे सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणायला सुरूवात केली आहे. त्याचाच उद्रेक झाल्याने आज पोलिसांच्या कुटुंबीयांचा मोर्चा थेट राज ठाकरे दरबारात कृष्णकुंजवर पोहचला. मुलुंडच्या पोलिस वसाहतीतील या महिलांनी आज आपले राहत्या घराबाबतचे गाऱ्हाणे मनसे प्रमुखांकडे मांडले.

MNS police

- Advertisement -

पोलिसांच्या कुटुंबीयांकडून राज ठाकरे यांची वेळ घेण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळीच पोलिसांचे कुटुंबीय राज ठाकरे यांच्या भेटीला हजर झाले. आपल्या कुटुंबावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून कशा प्रकारे घर खाली करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे याबाबतचे निवेदन दिले. राज ठाकरेंना पोलिस पत्नींकडून निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर राज ठाकरे यांनी पोलिस पत्नींचे म्हणणे सविस्तर एकून घेतले. तसेच त्यांना देण्यात आलेले निवेदनही सविस्तरपणे त्यांनी वाचले. या निवेदनावर उत्तर देत त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही पोलिस कुटुंबीयाला घर सोडण्याची गरज नाही. मी लवकरच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलेन असे त्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच या विषयावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता असा गाजावाजा याआधीच मनसे नेत्यांकडून झाला होता. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक शिष्टमंडळांनी आपल्या प्रश्नांसाठी दाद मागण्याचे हमखास ठिकाण म्हणजे कृष्णकुंज हेच निश्चित केले होते. अनेक व्यवसाय, छोटे मोठे उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्यानंतर कोरोनाच्या निर्बंधानंतर लोकांवर आर्थिक संकट ओढावले होते. त्यामुळेच अनेकांनी मनसेच्या प्रमुखांचा दरवाजा ठोठावत कृष्णकुंज गाठले होते. त्यामध्ये मुंबईतील ग्रंथालय कर्मचारी, जिम ट्रेनर, मुंबईचे डबेवाले, कोळी महिला आणि वारकरी मंडळे अशा अनेक क्षेत्रातील लोकांनी कृष्णकुंजवर विश्वास दाखवला. महत्वाच म्हणजे या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर राज्य सरकारकडून अनेक विषयात लॉकडाऊनचे नियम त्या घटकांसाठी शिथील झाले हे विशेष.


 

- Advertisement -