घरमुंबईराज ठाकरेंचा मोदींवर निशाणा, व्यंगचित्रातून टीका

राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा, व्यंगचित्रातून टीका

Subscribe

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांनी पंतप्रधान मोदींवर व्यंगचित्रातून टीका केली.

गुजरातमध्ये नर्मदेच्या पात्रात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य स्मारकाचे मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे. मात्र त्याआधीच विरोधकांकडून मोदी आणि भाजप सरकारवर टीका होताना दिसत आहेत. यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उडी घेतली असून, व्यंगचित्राद्वारे त्यांनी भाजपाला लक्ष केले आहे. ‘वल्लभाई पटेल यांच्या स्मारकावरील खर्च २,२९० कोटी रुपये इतका आहे, हे वल्लभभाईंना तरी कसं पटेल?’, असा सवाल राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून विचारला आहे. आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान मोदींना नेहमीच लक्ष करणाऱ्या राज ठाकरेंनी आता स्मारकाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

सौजन्य- फेसबुक

व्यंगचित्रात नेमकं काय?

या व्यंगचित्रामध्ये नरेंद्र मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला हार घालताना दाखवण्यात आले आहे. मोदींसोबत अमित शाहा तसेच भाजपाचे इतर मंत्री दाखवण्यात आले आहेत. ”अरे तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करून पुतळे उभारण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसे जगवा” अशी टीकाही या चित्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. स्वत: सरदार वल्लभभाई पटेल यांच्याच तोंडी हे वाक्य दाखवण्यात आलं आहे.

- Advertisement -

पुतळ्याविषयी थोडक्यात…

सरदार वल्ल्भभाई पटेल यांचा पुतळी जगातील सर्वात मोठा पुतळा असून, त्याची उंची तब्बल १८२ मीटर आहे. या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबरला होत आहे. वल्ल्भभाई पटेलांच्या या स्मारकात एक संग्रहालयसुद्धा असणार आहे. या संग्रहालयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती दिली जाणार आहे. या पुतळ्याचे काम २०१३ मध्ये सुरू झाले होते. लार्सन अँड टुब्रो या कंपनीला या पुतळ्याचा कंत्राट देण्यात आले होते. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे. गुजरातचं मुख्य शहर अहमदाबादपासून साधारण २०० किमी अंतरावर हे स्मारक उभारण्यात आलं आहे. जवळपास २ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी या स्मारकाच्या निर्मितीचं काम केलं आहेत. यामध्ये काही चीनी कामगारांचासुद्धा समावेश आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -