घरताज्या घडामोडीआधुनिक रॅंडला जनता धडा शिकवेल - मनसे

आधुनिक रॅंडला जनता धडा शिकवेल – मनसे

Subscribe

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खिल्ली उडवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. कोरोनाच्या बाबतीत सोयीचे आणि सूडाचे राजकारण सुरू असल्याचा सूर त्यांच्या बोलण्यातून समोर आला. त्यापाठोपाठच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत एक ट्विट केले आहे. मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तुलना इंग्रज अधिकारी रॅंडसोबत केली आहे. आत्ताच्या आधुनिक रॅंडला येणाऱ्या निवडणूकीत जनता धडा शिकवेल, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. राज्यात कोरोनाच्या निर्बंधांच्या नावाखाली राज्य सरकारकडून सण उत्सवांवर बंदी घालतानाच दुसरीकडे राजकीय पक्षांची आंदोलने आणि मेळावे, मोर्चे यासाठी मात्र कशा काय परवानग्या मिळतात असा प्रश्न मनसेने लावून धरला आहे.

- Advertisement -

राज्यात प्लेगची साथ आहे. प्लेगच्या साथीच्या निमित्ताने १८९७ साली रॅंडने जनतेवर भयानक अत्याचार केली. त्यावेळी चाफेकर बंधूंनी रॅंड या इंग्रज अधिकाऱ्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रॅंडला येणाऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. मनसेने सण उत्सवावर कोरोनाच्या निर्बंधांमुळेच आता सरकारचा विरोध जुगारत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यंदाच्या दहीहंडी सणाच्या निमित्ताने मुंबईसह अनेक ठिकाणी मनसेकडून दहीहंडी फोडण्यात आली. सरकारने या दहीहंडी आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवा सेनेच्या आंदोलनावरून तसेच भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीवर टीका केली होती. तसेच महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने सत्ताधारी पक्षांची सुरू असणाऱ्या तयारीवरही त्यांनी टीका केली होती. राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी आखणी करत आहेत. त्यांच्या सोयीने निवडणुका घोषित होतील, असेही राज ठाकरे म्हणाले होते. तसेच हिंदूंच्या सणांवरच बंधने येत असल्याचेही ते म्हणाले. गर्दी कुठेही कमी झालेली नाही, मग कुठेय कोरोना असाही सवाल त्यांनी केला होता. एकुणच सोयीचे आणि सूडाचे राजकारण राज्यात सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याबाबत राज ठाकरेंनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने समाचार घेतला होता.

- Advertisement -

हे ही वाचा – मनसे मंदिरांबाहेर करणार घंटानाद


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -