घरताज्या घडामोडीविरप्पनचा टॅब! विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या टॅबमध्ये भ्रष्टाचार, मनसेचा शिवसेनेवर आरोप

विरप्पनचा टॅब! विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या टॅबमध्ये भ्रष्टाचार, मनसेचा शिवसेनेवर आरोप

Subscribe

टेडर Eduspars International Pvt. Ltd. या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीचे संचालक रुस्तम कारीवाला हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत, असा दावा देशपांडे यांनी केला.

मुंबई महानगरपालिकेचा दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रस्ताव वादात सापडलेला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. इंटरनेट वायफाय नसलेले हे विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत तसंच या टॅबचा टेंडर काही विशिष्ट कंपन्यांनाच दिल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा ठरवण्यात आला आहे. मात्र दहावीची परीक्षा जवळ आली तरी देखील या विद्यार्थ्यांना त्यात मिळालेले नाहीत. तसेच टॅब टेंडर एका विशिष्ट ग्रुप तसंच एका जवळच्या कंपनीला मिळून भ्रष्टाचार करणार असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. पुढे देशपांडे म्हणाले, टेडर Eduspars International Pvt. Ltd. या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीचे संचालक रुस्तम कारीवाला हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत, असा दावा देशपांडे यांनी केला. आदित्य ठाकरेंच्या जवळचे असल्यामुळे त्यांना हे कंत्राट दिलं असा आरोप देशपांडे यांनी केला.

- Advertisement -

टॅबमध्ये भ्रष्टाचार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासंदर्भातील पुरावे आम्ही महापौर, लोकायुक्त आणि एसीबीकडे देणार आहोत. महापौर किशोरी पेडणेकर पुरावे मागत असतात, त्यांना पुरावे देणार आहोत,  संदीप देशपांडे यांनी सांगितले. तसंच चष्म्याचा नंबर बदलून ते सर्व नीट बघा, असा टोला देखील देशपांडे यांनी किशोरी पेडणेकर यांना लगावला.

मनसेचे पालिकेला सवाल

टॅबचे टेकनिकल फिचरमध्ये पहिल्यांदा QUAD CORE होते. ते नंतर बदलून AQUTA CORE असे केले. मुलांना टॅब या पॅनडामीक परिस्थितीमध्ये घरी वापरणे योग्य असल्याने इंटरनेट सुविधाही देण्यात यावी असे होते. त्यासाठी सिमकार्ड आणि वायफाय सेवा ही फक्त मुलांना शाळेतच मिळणार आहे. टॅब घरी घेवून जाता येणार नाही. टॅब हे शाळेतच राहतील. टॅब जर शाळेत राहिले तर त्या टॅपवर मुले शाळा बंद असताना अभ्यास कसा करणार?

- Advertisement -

टॅब जर शाळेत राहिला तर त्यावरील अभ्यासक्रम बघण्यासाठी त्या टॅबला चार्ज करावे लागेल. चार्जिंग मुले शाळेत येवून करणार का? का शाळेतील शिक्षक करणार ? २०,००० टॅब चार्ज करण्यासाठी महानगर पालिका शाळेत २०,०००  स्विचेस तयार करून रात्रभर चार्ज करणे कितपत योग्य आहे? हे टॅब १० वी च्या मुलांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी देणार आहे. पण १०वी ची मुले ही एस.एस.सी. ची बोर्ड परीक्षा देतात आणि उत्तीर्ण होतात. मग एस. एस. सी बोर्डाने या टॅबवर परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे का? आणि एमसीजीएमच्या १० वीच्या विद्यार्थ्यासाठी एसएससी बोर्डाने परीक्षा केंद्रावर टॅब घेवून येण्यास परवानगी दिली आहे का? असे सवाल मनसेने मुंबई महानगरपालिका आणि शिवसेनेला केले आहेत.


हेही वाचा – नितेश राणेंचा जामीन हायकोर्टाने फेटाळला, अटकेची शक्यता

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -