घरमनोरंजन'मराठी चित्रपट थिएटर्सला लावा नाही तर मनसेशी गाठ आहे'

‘मराठी चित्रपट थिएटर्सला लावा नाही तर मनसेशी गाठ आहे’

Subscribe

मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळावेत यासाठी मनसे नेहमीच आग्रही असते. या आधी अनेकवेळा मराठी चित्रपटांना थिअटर्स मिळावेत यासाठी मनसेने आंदोलने केली आहेत. वेळप्रसंगी थिअटर्स मालकांना जाबही विचारले आहेत. एखादा मराठी चित्रपट ब़लिवूडच्या मोठ्या चित्रपटाबरोबर प्रदर्शित झाला की मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळणं कठीण होतं. थिअटर्स मालकही हिंदी चित्रपटांना प्राधान्य देतात आणि मराठी चित्रपट डावलला जातो. काही थिएटरला तर मराठी चित्रपटच लागत नाहीत. सांताक्रुझ पूर्व येथे ओरियन मुक्ता ए२ नामक थियेटर सुरू होवून जवळपास दोन महिने झाले पण एकही मराठी चित्रपट अद्याप प्रदर्शित केला नाही. हे लक्षात येताच मनसेने आपला मोर्चा या थेएटरकडे वळवला.

- Advertisement -

या विरोधात मनसेचे अखिल चित्र यांनी थेएटरच्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. लवकरात लवकर थिअटर्समध्ये मराठी चित्रपट सुरू करावेत अशी मागणी केली. या थेएटरला केवळ हिंदी आणि गुजराती चित्रपट लागतात. त्यामुळे आता मनसेच्या अखिल चित्रेने या थेएटरने मराठी चित्रपटांना प्राधान्य दिलं नाही तर गाठ आमच्याशी आहे असे सांगितले आहे.

‘मराठी साठी चा लढ़ा आहे ईतर भाषेचा आपमान आमचा हेतू नाही! सांताक्रुझ पूर्व येथे ओरियन मुक्ता ए२ नामक थियेटर सुरू होवून जवळपास दोन महिने झाले पण एकही मराठी चित्रपट अद्याप प्रदर्शित केला नाही ही दुर्दैवी बाब आमच्या लक्षात येताच त्यांना जाब विचारून समज देण्यात आली. पण #मनसे च्या मराठी मागणी नंतर ह्या नटद्रष्ट मुजोर थियेटर प्रशासनाने मराठी ऐवजी गुजराती चित्रपटाला प्राधान्य देत प्राईम टाईम शो दिला. आता मत्र गाठ आमच्याशी आहे’ अशी पोस्ट सोशलमिडीयावर लिहीत अखील चित्रे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -