घरताज्या घडामोडीमनसे नेते अविनाश जाधव यांची अखेर जामिनावर सुटका!

मनसे नेते अविनाश जाधव यांची अखेर जामिनावर सुटका!

Subscribe

ठाण्यातील महानगरपालिकेच्या कोविड १९ या रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले मनसेचे ठाणे -पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव याना शुक्रवारी न्यायालयाने १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अविनाश जाधव यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

वसई- विरार महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात कार्यकर्त्यांसह प्रवेश करून आंदोलन केल्यानंतर मनसेचे ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. जाधव यांच्या विरोधात पालघर पोलिसांनी हद्दपारीची प्रक्रिया सुरु करून त्यांना याप्रकरणी नोटीस बजावल्यानंतर ३१ जुलै रोजी ठाणे महानगरपालिकेच्या कोविड १९ रुग्णालयातील नर्स यांच्या आंदोलनात जाधव आपल्या कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. या वेळी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अविनाश जाधव यांना ताब्यात घेऊन कापूरबावडी पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यात आला होता.

- Advertisement -

कापूरबावडी पोलिसांनी अविनाश जाधव यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, विनापरवानगी रुग्णालयात बळजबरीने प्रवेश केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. जाधव यांच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. अविनाश जाधव यांच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने दोन्ही कडील बाजू ऐकून घेतली. त्यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना काही अटींवर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान ५ वाजेच्या सुमारास अविनाश जाधव यांना तळोजा कारागृहातून सोडण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -