घरताज्या घडामोडीप्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही- बाळा नांदगावकर

प्रत्येकाला राज ठाकरे होता येत नाही- बाळा नांदगावकर

Subscribe

मनसेत अस्वस्थता पसरली असून गळती थांबवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही असा टोला लगावत मनसेतून जाणाऱ्यांच्या एकनिष्ठतेवरच बोट ठेवले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण डोंबिवलीत गळती लागली असून सोमवारी मनसेच्या राजेश कदम यांनी मनगटावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. त्यास २४ तास उलटण्याच्या आधीच मंदार हळबे यांनीही मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे मनसेत अस्वस्थता पसरली असून ही गळती थांबवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सगळ्यांनाच राज ठाकरे होता येत नाही असा टोला लगावत मनसेतून जाणाऱ्यांच्या एकनिष्ठतेवरच बोट ठेवले.

राजेश कदम यांच्यापाठोपाठ मंदार हळबे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर आज कृष्णकुंजवर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस बाळा नांदगावकर , कल्याण डोंबिवलीचे आमदार राजू पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी पक्षगळतीला लगाम कसा लावावा यावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात पक्षांतराच्या गोष्टी घडत असतात. यामुळे यात नवीन असं काही नाही. याआधीही निवडणुकीत राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे अनेकजण पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेल्याचे सांगितले. तसेच पुढे काय होईल ते बघा असेही ते म्हणाले.
तसेच काहीजणांनी पक्ष सोडल्याने काही फरक पडत नाही. असे सांगत त्यांनी जुने गेले की नवीन कार्यकर्ते .येतच असतात असे सांगत सगळेच राज ठाकरे होत नाहीत असेही म्हटले.
बाळा नांदगावकर यांच्याप्रमाणेच आमदार राजू पाटील यांनीही हळबे यांना आमीष दाखवल्याने त्यांनी पक्ष सोडला असे सांगितले. त्याचबरोबर कोणी गेल्याने पक्षाला काही फरक पडत नसल्याचे सांगितले.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -