घरमुंबईपेट्रोल-डिझेल नाही तर मद्यावरील कर वाढवा, मनसेची ठाकरे सरकारकडे मागणी

पेट्रोल-डिझेल नाही तर मद्यावरील कर वाढवा, मनसेची ठाकरे सरकारकडे मागणी

Subscribe

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट २ रुपयांनी वाढवला, सरकारच्या या निर्णयाला मनसेचा विरोध

जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे संपर्ण जगावरच वाईट परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला मात्र यामुळे अनेकांचे रोजगार गेलेत. यासह संपुर्ण देशाची अर्थव्यवस्था खालावली असल्याने सरकारचा महसूलात देखील घट झाली. त्यामुळे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (VAT) २ रुपयांनी वाढवला होता. सरकारच्या या निर्णयाला मनसेने विरोध केला असून दरम्यान मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी पेट्रोल-डिझेलवर नाही तर दारुवरील कर वाढवण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक दुकानं वगळता सर्व दुकानं बंद करण्यात आली होती. त्यानंतर मात्र मद्याची दुकानं देखील सुरू करण्यात आल्यानंतर दारु विक्रीला सरकारकडून महिनाभरापूर्वीच परवानगी मिळाली. लॉकडाऊनमध्ये दारू उपलब्ध झाल्याने अनेक वाईन्स शॉप्सवर गर्दी देखील झाली. लॉकडाऊनमध्ये अनेक राज्य सरकारांनी दारुवर अधिकचा करही लादला होता. या मुद्द्याला लक्षात घेऊन बाळा नांदगावकर यांनी ही मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले की, महसूल तूट भरून काढण्यासाठी राज्यसरकारने नुकतीच पेट्रोल व डिझेल वर २ रुपये मूल्यवर्धित कर (VAT) वाढविला , सरकारने याऐवजी मद्यावरील कर वाढवावा हे मार्च महिन्यापासून सुचवित आहे. कारण आधीच आपल्या राज्यात इंधनाचे दर इतर अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत व त्यात हा अधिभार. हे ट्विटकरत त्यांनी असे सांगितले की, इंधनावर अधिभार लादल्याने सगळ्याच गोष्टी महाग होतात. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात आणि महागाई होते, त्यामुळे असा कर लादू नये,अशी मागणीही त्यांनी केली आहे.


योगी आदित्यनाथ यांचे पाकिस्तानकडून कौतुक!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -