Sunday, June 20, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई पालिकेने आता वॉटरपार्क सुरू केलंय का? आदित्य ठाकरेंच्या 'त्या' दाव्यावरून मनसेचा सवाल

पालिकेने आता वॉटरपार्क सुरू केलंय का? आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावरून मनसेचा सवाल

Related Story

- Advertisement -

पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत वणी तुंबणार नाही, असा दावा केला होता. यावरून मनसे नेते अखिल चित्रे यांनी निशाणा साधला आहे. मुंबईत आज मान्सूनने जोरदार हजेरी लावली. अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. या पार्श्वभूमीवर अखिल चित्रे यांनी आदित्य ठाकरे यांनी याआधी केलेल्या दाव्यावरून उपहासात्मक सवाल केला आहे.

अखिल चित्रे यांनी ट्विट करत सवाल केला आहे. यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दाव्याची बातमी देखील शेअर केली आहे. “मग आदित्य ठाकरे आज काय महानगरपालिकेने जल क्रीडा स्थळ (water park) सुरू केलं आहे का?” असं ट्विट करत सवाल केला आहे.

- Advertisement -

 

हिंदमाता, किंग्जसर्कल आदी सखल भागात गुडघाभर पाणी साचले

- Advertisement -

मुंबईत ९ ते १२ जून या कालावधीत चार दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा पूर्व इशारा हवामान खात्याकडून दोन दिवस अगोदरच देण्यात आला होता. हिंदमाता, किंग्ज सर्कल , कुर्ला, घाटकोपर, माटुंगा, अँटॉप हिल, दादर, परळ, भायखळा, सायन , अंधेरी सब वे, मालाड सब वे आदी काही सखल भागात वीतभर ते गुडघाभर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊन काही ठिकाणी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. तर नागरीकांनाही साचलेल्या पाण्यामधून कामासाठी घराबाहेर पडावे लागले. तसेच, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाला आहे.

 

 

- Advertisement -