घरमुंबईसंदीप देशपांडे, संतोष धुरींची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

संदीप देशपांडे, संतोष धुरींची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव

Subscribe

याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरी, दादर शाखाप्रमुख संतोष साळी आणि कारचा ड्रायव्हर यांच्या विरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मशिदींवरील भोंग्.ांविरोधात 4 मे रोजी झालेल्या आंदोलनात देशपांडे आणि धुरी यांनी पोलिसांना चकवा देत कारमधून पळ काढला होता. तेव्हापासून ते दोघे फरार होते. यावेळी महिला पोलीस कर्मचारी जमिनीवर पडून जखमी झाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरी, दादर शाखाप्रमुख संतोष साळी आणि कारचा ड्रायव्हर यांच्या विरोधात कलम ३०८, ३५३, २७९ आणि ३३६ अन्वये गुन्हा दाखल केला. ड्रायव्हरला आणि संतोष साळी यांना अटक करण्यात आली होती. त्यांना सोमवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर घटनेच्या दिवसापासून संदीप देशपांडे, संतोष धुरी फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून 7 पथके तयार करण्यात आली.  मुंबई पोलिसांच्या 4 टीम आणि मुंबई क्राईम ब्राँचच्या 3 टीम दोघांचा मुंबई, पनवेल, नवी मुंबई, उरण, खोपोली या ठिकाणी शोध घेत आहे.

- Advertisement -

आता अटक होऊ नये म्हणून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. दोघांचा जामीन मंजूर होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या प्रकरणावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -