घरमुंबईमहिला पोलिसाला धक्काबुक्की केली नाही, संदीप देशपांडेचा दावा

महिला पोलिसाला धक्काबुक्की केली नाही, संदीप देशपांडेचा दावा

Subscribe

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये आंदोलन करण्यात आले. यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. तर देशपांडे यांना ताब्यात घेत असताना ते पोलिसांना धक्का देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेट सरकारला दिल्यानंतर बुधवारी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये आंदोलन करण्यात आले. यावर पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. तर देशपांडे यांना ताब्यात घेत असताना ते पोलिसांना धक्का देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाली. देशपांडे यांनी या पोलीस महिलेला धक्का दिल्याचे बोलले जात होते. त्यानंतर दिवसभर पोलीस देशपांडे यांचा शोध घेत होते. मात्र, ते सापडले नाहीत.

संदीप देशपांडे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का दिला हा आरोप खोडून काढला आहे. मी महिला काॅन्स्टेबलला घक्काबुक्की केलेली नाही. महिला पोलिसांना माझा स्पर्शही झाला नाही.  तसेच मी कुठेही पळून गेलो नाही. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आलो होतो, असे स्पष्टीकरण संदीप देशपांडे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासावे असे सांगून खोटे गुन्हे दाखल केले तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

मनसेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी खबरदारी म्हणून अनेकांना नोटीसा पाठवल्या होत्या.  पोलिसांनी मंगळवारपासून वेगवेगळया भागातून मनसैनिकांची धरपकड केली. तर अनेक मनसैनिक भूमिगतही झाले होते.  अजूनही राज्यातील वेगवेगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -