घरमुंबई'तुमची ती Night Life आणि जनतेची...'; मनसेने केले शिवसेनेला टार्गेट

‘तुमची ती Night Life आणि जनतेची…’; मनसेने केले शिवसेनेला टार्गेट

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर साधला निशाणा

राज्यात महापालिका क्षेत्रात मंगळवारपासून रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या एका बैठकीत झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाययोजनांसाठी बैठक घेतली. दरम्यान यावरूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करून शिवसेनेला टार्गेट केले आहे. यावेळी त्यांनी ”तुमची night life ती night life आणि जनतेची पार्टी करो ना!!” असे कॅप्शन देत सामना वृत्तपत्रातील बातमीचे कात्रण देखील शेअर केले आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोनाच्या नियमांचे पालन न करता बेभान पार्ट्या करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान, मुंबई पोलिसांनी अंधेरीतील एका क्लबवर धाड टाकून सेलिब्रिटींसह अनेकांवर कारवाई केली. या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी अशा पार्ट्या करणाऱ्यांना ट्विटरवर इशारा देखील दिला.

- Advertisement -

‘पार्टी (नही) चलेगी, टिल सिक्स इन द मॉर्निंग…’ पोलिसांनी दिलेल्या या इशाऱ्याला अनेकांनी प्रतिसाद दिला असून पोलिसांच्या या ट्विटचे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी स्वागतही केले आहे. पोलीस प्रशासनासह राज्य सरकार, पालिका प्रशासन आवश्यक ती खबरदारी घेत आहेत. पब, बार, क्लबमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध घालण्यात आली. यानंतरही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘पार्टी (नही) चलेगी, टिल सिक्स इन द मॉर्निंग…’, असे ट्विट करत ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरच्या रात्री पार्ट्यांचा प्लान करणाऱ्यांना पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, २६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफला परवानगी देण्यात आली. त्यानंतर मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर २४ तास खुले झाले असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु असल्याचे दिसते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाययोजनांसाठी बैठक घेतली होती.

आदित्य ठाकरेंची संकल्पना

मुंबईत नाईटलाईफ असावं ही संकल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप शिवसेना युती सरकारच्या वेळी आदित्य ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर यावर निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल असून या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरु राहू शकतात. तसेच ज्यांची इच्छा असेल ते २४ तास व्यवसाय करु असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग’! मुंबई पोलिसांचे ट्विट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -