घरताज्या घडामोडीमहागाई,अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचावासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महागाई,अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचावासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Subscribe

मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

वाढती महगाई ,अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचाव अशा घोषणा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कालावधीत झालेले जमीन निवाडे, व निर्णयाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली महागाई विरोधातही घोषणा बाजी करत निवेदन देण्यात आले.  अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी बेकायदेशीरपणे मायनिकला परवानग्या दिल्या आहेत इकोसेन्सेटिव्ह गावामध्ये परवानग्या दिल्या आहेत कळणे मायनींगच्या बाबतीतही याच अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दुर्घटना घडली आहे या मध्ये मोठे आर्थिक गैरव्यवहार केले असून अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि असे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नको आहेत असा आरोप करीत अतिरिक्त जिल्हाधिकारी हटावच्या मागणीसाठी सोमवारी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व विविध मागण्याचे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेऊन सादर केले.

सिंधुदुर्गनगरी येथील सिडको भवन येथे सर्व मनसेचे कार्यकर्ते एकत्र जमून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिन तावडे,विनोद सांडव,दत्ताराम बिडवाडकर,चंदन मेस्त्री
जिल्हा संघटनेचे बाळा पावसकर,दया मेस्त्री,दत्ताराम गावकर,शैलेश अंधारी,कुणाल किनळेकर,अमित इब्राहिमपुरकर,आशिष सुभेदार,बाबल गावडे,दीपक गावडे,सचिन सावंत,आपा मांजरेकर,राजेश टंगसाळी आदीसह बहुसंख्य मनसे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

- Advertisement -

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना जिल्ह्यात सर्व खनिजांना नियमबाह्य मंजुरी देणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याची बदली करावी,त्यांच्या कालखंडात झालेले जमीन निवाडे,डंपर व खनिजांचे दंड माफ करण्याच्या अपील झालेल्या निवाड्याची फेर चौकशी करावी ,अप्पर जिल्हाधिकारी शासकीय निवासस्थानात न राहिल्यामुळे नादुरुस्त झालेल्या शासकीय निवासस्थानाच्या नुकसानीची वसुली करावी अशा विविध १६ मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले व अप्पर जिल्हाधिकाऱ्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यासाठी त्याची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानीही मागण्याची दखल घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

तसेच गॅस,पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत तसेच तेल व इतर वस्तूचे दर देखील वाढले आहेत महागाईचा चटका सर्वसामान्य लोकांना बसत आहेत त्यामुळे महागाई विरोधातही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन महागाई कमी करण्याची मागणी केली सिडको भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढताना कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा सोमवारी दुपारी १२ वाजता धडकताच पोलिसांनी कडे करून प्रवेश द्वारावर रोखला त्यानंतर मोर्चाचे स्वरूप सभेमध्ये झाले यावेळी उपरकर यांनी मोर्चेकराना संबोधित केले जमावबंदी असतानाही मोर्चा काढला गेल्याने पोलिसांनी मनसेच्या २५ कार्यकर्त्यांना अटक केली व प्रतिबंधात्मक कारवाई करून सुटका केली.


हेही वाचा – राणेंना सूक्ष्म उद्योग खातं मिळालं, त्यामुळे त्यांचं डोकंही सूक्ष्म झालं; गुलाबराव पाटलांची जहरी टीका

महागाई,अप्पर जिल्हाधिकारी हटाव व पर्यावरण बचावासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -