घरमुंबईसर्व पक्षांनी बिनविरोध राज्यसभेत पाठवण्याचे पुण्य पदरात पाडून घ्यावे - राजू पाटील

सर्व पक्षांनी बिनविरोध राज्यसभेत पाठवण्याचे पुण्य पदरात पाडून घ्यावे – राजू पाटील

Subscribe

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांच्या समर्थनार्थ मनसेने पुढाकार घेतला आहे. कल्याण ग्रामीनचे मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी संभाजीराजेंना (Sambhaji Raje) सर्व पक्षांनी बिनविरोध राज्यसभेत पाठवण्याचे पुण्य पदरात पाडून घ्यावे, असे ट्वीट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

हेही वाचा – खासदार संजय राऊतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, संजय पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

- Advertisement -

राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje)यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे ट्विट राजू पाटील (Raju Patil) यांनी केले आहे.

- Advertisement -

सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन संभाजीराजेंनी केलं होतं. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -