घरताज्या घडामोडीLive Update - मनसे मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने; राजठाकरेंसह कुटुंब मोर्चात सामील

Live Update – मनसे मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने; राजठाकरेंसह कुटुंब मोर्चात सामील

Subscribe

पाकिस्तानी, बांगलादेशींना हुसकावण्यासाठी आज मनसेचा एल्गार.

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (NRC) यावरुन देशभरात प्रचंड वादंग सुरु असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बेकायदेशीररित्या राहणार्‍या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मोर्चाची उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती. मनसेने मोर्चासाठी आधी भायखळ्यातील राणीचा बाग ते आझाद मैदान या मार्गाची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. मात्र, पोलिसांनी ती नाकारत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मार्गासाठी परवानगी दिली असून हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे. तसेच राज ठाकरे आझाद मैदानावर कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -