घरताज्या घडामोडीVIDEO - ही लढाई आहे...मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज

VIDEO – ही लढाई आहे…मनसेच्या महामोर्चाचा टिझर रिलीज

Subscribe

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात येत्या ९ फ्रेबुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महामोर्चा काढणार असून या महामोर्चाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात येत्या ९ फ्रेबुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महामोर्चा काढणार आहे. या महामोर्चासाटी मनसेने वातावरण निर्मिती सुरु केली असल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या महामोर्चाचा पहिला टिझर आज मनसेने जारी केला आहे. महामोर्चात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करणारे फलक देखील ठिकठिकाणी झळकू लागले आहेत.

…अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चा

…अजून किती काळ आपण गाफील राहणार आहोत? #मनसे_महामोर्चा

MNS Adhikrut ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 5, 2020

- Advertisement -

गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मनसे महामोर्चातून शक्तिप्रदर्शन करणार आहे. आझाद मैदान येथे पोलिसांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी ऑगस्ट २०१२ मध्ये राज ठाकरे यांनी गिरणगावात चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढला होता आणि आता तब्बल ८ वर्षांनी मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरे पुन्हा एकदा पक्षातर्फे आयोजित महामोर्चचे नेतृत्व करणार आहेत.

वर्सोवात मनसेची पोस्टरबाजी

वर्सोवा येथे मनसेने फलकबाजी केली आहे. त्यामध्ये ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा’ असे पोस्टरवर मराठीत लिहिण्यात आले आहे. मनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि उपविभाग अध्यक्ष अशोक पाटील यांची पोस्टरवर नावे असून बांगलादेशी घुसखोरांना निघून जाण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

असा निघणार मोर्चा

येत्या ९ फ्रेबुवारीला दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा मनसेचा मोर्चा निघणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा काढण्यात येणार आहे. याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने नवा मार्ग निवडण्यात आला आहे.


हेही वाचा – हिंगणघाटसारख्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -