घरमुंबईमनसेच्या गोटात मोठी खळबळ, ३२० पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

मनसेच्या गोटात मोठी खळबळ, ३२० पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Subscribe

पक्षांतर केलेल्यांना मनसेमध्ये मोठी पद

कल्याण डोंबिवली महापालिकेची आगामी निवडणूक काही महिण्यांवर येऊन ठेपली आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर नियुक्त्यांमुळे मनसेच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे. मनसेमध्ये जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमुळे काही नाराज विभागीय संघटक, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष अशा एकूण ३२० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठे भगदाड पडले आहे. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्यांना पक्षात मोठी पद देण्यात येत आहेत. त्यामुळे जुने जानते सदस्य नाराज झाले असल्याने पक्षाला गळती लागली आहे.

पक्षांतर केलेल्यांना मनसेमध्ये मोठी पद देण्यात आले आहे. हेच पदाधिकारी पहिले स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले होते. परंतु आता पुन्हा पक्षात अल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण पूर्वमधील मनसे नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सर्व पक्ष वर्चस्व मिळवण्यासाठी निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत. यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांत पदांचे वाटप करण्यात आले आहेत. परंतु याच पदांच्या वाटणीवरुन मनसेतील काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांची शिवसेनेतून घरवापसी झाली आहे. त्यांनी मनसेत प्रवेश केल्यावर कल्याण पूर्व विधानसभाक्षेत्र अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यानंतर काही पदाधिकाऱ्यांना मनसेत मोठी पद देण्यात आली आहेत. घरवापसी करणाऱ्यांना पक्षात मोठी पदे देण्यात आल्यामुळे मनसेतील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -