राज ठाकरेंनी केली निलेश माझिरेंची नाराजी दूर, देण्यात आले माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पद

MNS president Raj Thackeray made an understanding with Nilesh Mazire

मनसेचे माजी पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे आणि निलेश माझिरे यांनी शिवतीर्थवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे सोडलेल्या निलेश माझिरेंची समजूत काढली. त्यानंतर त्यांना पुणे जिल्हा माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्षपदाला स्थानिक नेते विरोध करत असल्याने निलेश माझिरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला होता. निलेश माझिरे हे वसंत मोरेंचे कट्टर समर्थक असून त्यांची मनसेच्या माथाडी सेनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

माझिरेंनी केले होते आरोप –
मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राज्य सरचिटणीस बाबू वागस्कर आणि कोअर कमिटीतील इतर सदस्य यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचे कारण निलेश माझिरे यांनी दिले होते. 19 मे रोजीमनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही ठिकाणी पाहण्यात आल्या होत्या. या प्रकारानंतर निलेश माझिरे यांची हकालपट्टी करा, असे साईनाथ बाबर म्हणाले होते. तर तू पक्षात राहणार आहेस का, अशी विचारणा बाबू वागस्कर यांनी केली होती. मला बोलावून घेऊन पक्षात राहणार आहात का, असे हे लोक विचारतात, असा सवाल माझिरे यांनी केला होता.

मनसेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर –
काही दिवसांपासून पुणे मनसेतील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. वसंत मोरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर तो अधिक दिसून येवू लागला. वसंत मोरेंना पक्षात एकाकी पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर निलेश माझिरे हे त्यांचे समर्थक मानले जातात. त्यांनाही त्रास देण्यात आला. यावेळी साईनाथ बाबर, बाबू वागस्कर यांसह काही नेत्यांची नावे घेण्यात आली. सध्या राज ठाकरेंनी माझिरेंची समजूत काढली असली तरी हा वाद इतक्यात मिटेल, असे दिसत नाही. राज ठाकरे याप्रकरणी काय भूमिका घेतात, ते पाहावे लागणार आहे.