घरताज्या घडामोडीमनसेचा एल्गार : मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना, मनसेच्या वाहनांना टोल फ्री

मनसेचा एल्गार : मनसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना, मनसेच्या वाहनांना टोल फ्री

Subscribe

पुणे - कोल्हापूर, पुणे - सोलापूर आणि पुणे - मुंबई महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेच्या वाहनांना टोल फ्री दिला आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (NRC) यावरुन देशभरात प्रचंड वादंग सुरु असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बेकायदेशीररित्या राहणार्‍या पाकिस्तानी आणि बांगलादेशींविरोधात एल्गार पुकारला आहे. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाकरता राज्यभरातून अनेक मनसेचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत. दरम्यान, मनसेच्या मोर्चामध्ये सामील होणाऱ्या वाहनांना टोल आकारला जाऊ नये, यासाठी मनसेकडून निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार, पुणे आणि नाशिकहून मुंबईला येणाऱ्या वाहनांना टोल मोफत करण्यात आला आहे.

- Advertisement -

या मार्गावर मनसेच्या वाहनांना टोल फ्री

मनसेच्या महामोर्चात पुणे जिल्ह्यासह पुणे कोल्हापूर आणि पुणे सोलापूर महामार्गावरुन अनेक लोक मुंबईत त्यांच्या वाहनाने दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून टोल आकारला जाऊ नये, असे निवेदन देण्यात आले होते. त्याप्रमाणे टोल नाक्यावर कोणताही वाद विवाद होऊ नये, म्हणून पुणे कोल्हापूर, पुणे सोलापूर आणि पुणे मुंबई महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेच्या वाहनांना टोल फ्री दिला आहे.


हेही वाचा – Live Update – पाकिस्तानी – बांग्लादेशीयांनो…चले जाव!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -