घरताज्या घडामोडीAmazon विरुद्ध मनसे; 'नो मराठी, नो Amazon'! मनसेचा खळखट्याक

Amazon विरुद्ध मनसे; ‘नो मराठी, नो Amazon’! मनसेचा खळखट्याक

Subscribe

मनसेकडून मुंबईत Amazon विरुद्ध फलक लावण्यात आले असून त्यावर 'नो मराठी, नो Amazon',असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

मराठी भाषेवरुन पुन्हा एकदा मनसेचा वाद पेटल्याचे समोर आले आहे. Amazonवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमेनेने आता आक्रमक स्वरुप धारण केले आहे. मनसेकडून मुंबईत Amazon विरुद्ध फलक लावण्यात आले असून त्यावर ‘नो मराठी, नो Amazon’,असा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे फलक वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहिम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले असून आता Amazon यावर काय तोडगा काढणार हे पहाव लागणार आहे.

मग आम्हाला राज्यात तुम्ही नको

तुम्हाला आमची भाषा मान्य नाही, तर आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेकडून देण्यात आली होती. तसेच मनसेकडून Amazonच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकवण्यात येतील, असा इशारा देखील देण्यात आला होता. त्याप्रमाणे मुंबईत आता Amazon विरुद्ध फलक लागलेले दिसून येत आहेत.

- Advertisement -

मनसेचा खळखट्याक

काही दिवसांपूर्वी Amazon आणि फ्लिपकार्टच्या ऑनलाईन शॉपिंग Appमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याच्या मागणीसाठी मनसेने खळखट्याक केला होता. मुंबईच्या बीकेसी परिसरात या दोन्ही कंपन्यांच्या कार्यालयावर धडक देत त्यांना सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय न ठेवल्यास स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकी ही मनसेने दिली होती.

संबंधित टीमला आम्ही कळवतो

Amazon च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची Amazonचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला असून अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – उत्पन्नाचा दाखल सादर करण्यासाठी ‘या’ दोन योजनांसाठी राज्य सरकारने दिली सूट


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -