घरताज्या घडामोडीसध्या भारतात मोडी लिपी नाही तर मोदी लिपी दिसते - राज ठाकरे

सध्या भारतात मोडी लिपी नाही तर मोदी लिपी दिसते – राज ठाकरे

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला.

सध्या मनसे भाजपासोबत जाणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अच्युत पालव यांच्या पुस्तक प्रकाशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ‘अच्युत पालव जेव्हा काम करतात तेव्हा आपल्याला मोडी लिपी दिसते. अन्यथा आपल्याला सहसा मोडी लिपी दिसतं नाही. मात्र सध्या भारतात मोडी लिपी नाही तर मोदी लिपी दिसते. त्यामुळे आपली मोडी लिपी नाहीशी झाली आहे.’

आज मुंबईत अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं मनसे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या अक्षराबद्दल देखील सांगितलं. ‘माझं अक्षरं चांगलं बरं आहे. वडील आणि बाळासाहेब यांच्या अक्षरांमुळे माझं अक्षर चांगलं आहे. तसंच चांगलं अक्षर असणं यासारखं दुसरं समाधान नाही’, असं राज ठाकरे म्हणाले. यादरम्यान त्यांनी डॉक्टरांच्या अक्षरांबाबत देखील खिल्ली उडवली. ते म्हणाले की, ‘अच्युत पालव यांच्या पुस्तकामध्ये अक्षर सुंदर मोत्यासारखे असं वाक्य आहे. या वाक्याच्या पाट्या करा आणि डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बाहेर लावा.’

- Advertisement -

‘अच्युत पालव यांनी सुलेखनासाठी केलेलं काम अफाट आहे. मुंबईत २६ जुलैला जो पाऊस झाला होता त्यामध्ये त्यांचं अनेक साहित्य भिजलं. मात्र तरी देखील त्यांनी सुलेखनासाठीची मेहनत सुरुच ठेवली’, असं राज ठाकरेंनी म्हटलं. तसंच त्यांनी अच्युत पालव यांच्याशी असलेल्या संबंधाबद्दल देखील सांगितलं.


हेही वाचा – शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; २६ जानेवारीपासून लागू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -