घरताज्या घडामोडीराज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर लगावला अप्रत्यक्षपणे टोला

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर लगावला अप्रत्यक्षपणे टोला

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीचं त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रामुळे चर्चेत असतात. शनिवारी त्यांनी व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांच्या बोरिवलीतील व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. यादरम्यान त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री ते वर्षापर्यंतच्या प्रवासाबद्दल सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, ‘या उद्घाटनादरम्यान प्रशांत कुलकर्णी यांनी मातोश्री ते वर्षापर्यंतचा प्रवास सांगितला. फक्त प्रशांत कुलकर्णी यांनी या प्रवासामध्ये कोणाशी प्रतारणा केली नसावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.’

तसंच त्यांनी यावेळी आपल्यातली विनोदी शैली दाखवली. ते असं म्हणाले की, ‘प्रशांत कुलकर्णी यांच्या पती या व्यंगचित्राचे सेन्सोर करतात. नक्की इतकी वर्ष संसार केलात की सेन्सॉर केलात हेच कळतं नाही.’

- Advertisement -

हेही वाचा – मनसे – भाजप एकत्रित येण्याच्या हालचाली

शनिवारी बोरिवलीत प्रबोधन ठाकरे नाट्यगृहात प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शाचं नावं ‘बिटविन दी लाईन्स’ असून यामध्ये १५० व्यंगचित्र आहेत. यादरम्यान राज ठाकरेंनी प्रशांत कुलकर्णी यांनी रेखाटलेले व्यंगचित्र जवळून निहाळली.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे यांनी खातेवाटपा संदर्भात बोलण्यास स्पष्ट नकार दिला. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने येत्या २३ जानेवारीला गोरेगाव नेस्कोमध्ये मनसे महाअधिवेश आयोजित करण्यात आलं आहे. आता या महाअधिवेशनात राज ठाकरे काय बोलणार आहेत याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे.


हेही वाचा – अब्दुल सत्तार गद्दार, त्याला मातोश्रीची पायरी चढू देऊ नका – खैरे


 

एक प्रतिक्रिया

  1. Pls वाचा आणि छापा. प्रशांत किशोर लिहिलंय चुकून.
    इतरही चुका आहेत

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -