Raj Thackeray- राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेपूर्वी टीझर व्हायरल

मनसेने राज यांच्या सभेपूर्वी टिझर प्रसिद्ध केला आहे. यात राज यांच्या गुढीपाडवा सभा, उत्तरसभा यातील त्यांच्या मह्त्वाचे विधानांचे व्हिडीओ कट्स आहेत.

MNS Raj Thackeray arrange public meeting in Pune to decide Strategy

मनसेप्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचा ५ जूनचा अयोध्या दौरा रद्द करण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थामुळे हा दौऱा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती राज ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे. मात्र राज यांच्या अचानक रद्द झालेल्या या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यावर पुण्यातील सभेत सविस्तर भाष्य करणार असल्याचेही टि्वटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे या सभेसंदर्भात सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहीली असतानाच  राज यांच्या सभेपूर्वी एक टिझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात राज यांच्या गुढीपाडवा सभा, उत्तरसभा यातील त्यांच्या मह्त्वाचे विधानांचे व्हिडीओ कट्स आहेत.

राज ठाकरे उद्या रविवारी पुण्यात जाहीर सभा घेणार होते. सुरुवातीला ही सभा २१ मे ला नदीपात्रात घेण्याचे ठरले होते. मात्र पावसाची शक्यता लक्षात घेत आता सभेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आता ही सभा २२ मे रोजी गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सकाळी १० वाजता होणार आहे. राज यांनी अयोध्या दौऱ्यावर ५ जूनला जाण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या दौऱ्यास उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध असून जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवर पाऊल ठेवू देणार नाही असा धमकीवजा इशाराच  दिला आहे. तसेच सिंह यांच्या या आवाहनाचे समर्थन करण्यासाठी अनेक उत्तर भारतीय संघटनाही एकवटल्या आहेत. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये राज यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज यांनी ५ जूनचा अयोध्या दौरा रद्द केल्याचे बोलले जात आहे. मात्र राज यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या असून २२ मे रोजी पुण्यातील सभेत यावर आपली भूमिका मांडणार असल्याचे टि्वट केले आहे.

त्यामुळे राज यांच्या २२ मे च्या सभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. याचदरम्यान  राज यांच्या गुढीपाडवा, उत्तर सभा अशा काही महत्वपूर्व सभांमधील त्यांची रोखठोक विधाने अधोरेखीत करणारे व्हिडीओ टिझरमध्ये प्रसिद्ध केले आहेत. यातून राज आपल्या मतांवर ठाम असल्याचाच संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे. यात प्रामुख्याने, माझा कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाहीये. मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, असं राज यांचे विधान आहे. तसेच एका सभेत राज यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले विधान आहे. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान होतील ते झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्याचा विकास करावा असे राज बोलताना व्हिडीओत दिसत आहे. तसेच पुण्यातील हनुमान चालीसा पठणही टीझरमध्ये आहे. यामुळे या टिझरच्या माध्यमातून राज अजूनही आपल्या वक्तव्यांवर ठाम असल्याचे दिसत आहे.