Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा तिसरा टीझर लॉन्च, बाळासाहेब ठाकरेंची 'ती' क्लिप पाहून लोक...

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा तिसरा टीझर लॉन्च, बाळासाहेब ठाकरेंची ‘ती’ क्लिप पाहून लोक भावूक

Subscribe

बाळासाहेब ठाकरेंचे खरे वासरदार कोण यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये संघर्ष सुरू झालाय. अशात आता मनसेच्या या नव्या टीझरमधून 'तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी, चला शिवतीर्थावर' असं कॅप्शन दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या अनेक महिन्यापासून खरी शिवसेना कुणाची व धनुष्यबाणावर कुणाचा अधिकार यावरून ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष पहायला मिळतोय. तर दुसरीकडे मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या सभेसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या क्लिप असलेले टीजर लॉंच करताना दिसतेय. नुकताच मनसेनं सोशल मीडियावर त्यांच्या गुढीपाडवा मेळाव्याचा तिसरा टीझर लॉंच केलाय. या टीझरमध्ये मनसेनं मशिदींवरील भोंग्यासंदर्भात घेतलेली भूमिका दाखवण्यात आलीय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा येत्या २२ मार्चला मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडणार आहे. ‘तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी, चला शिवतीर्थावर’ असं कॅप्शन देत हा नवा टीझरला शेअर करण्यात आलाय. मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा टीझर शेअर केलाय. मशिदींची मुजोरी संपवावी… असे म्हणत या टीझरची सुरूवात होते. त्यानंतर मशिदींवरील भोंग्यांबाबत बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातील एक क्लिप समोर येते. बाळासाहेबांचं स्वप्न राज ठाकरेंनी पूर्ण केल्याचं या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय.

- Advertisement -

मविआचं सरकार सत्तेत असताना राज ठाकरेंच्या मनसेनं मशिदींवरील भोंग्यांविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली होती. त्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मनसेनं यासाठी केलेल्या कामगिरीचं दर्शन या टीझरमधून करण्यात आलंय. या सभेसाठी कर्जत ते दादर ही विशेष रेल्वे देखील सोडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती देखील मनसेच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे.

- Advertisement -

एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात आलंय. बाळासाहेब ठाकरेंचे खरे वासरदार कोण यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये संघर्ष सुरू झालाय. अशात आता मनसेच्या या नव्या टीझरमधून ‘तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी, चला शिवतीर्थावर’ असं कॅप्शन दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कॅप्शन वाचून राज ठाकरे त्यांच्या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार, कुणावर तोफ डागणार, पुढील दिशा काय ठरवणार हे ऐकण्यासाठी लोकांची उत्सुकता वाढली आहे.

- Advertisment -