घरताज्या घडामोडीमनसे पक्षाचा नवा झेंडा 'असा' असणार

मनसे पक्षाचा नवा झेंडा ‘असा’ असणार

Subscribe

मनसे पक्षाचा नवा झेंडा समोर आला आहे.

राज्यात ‘महाविकास’ आघाडी स्थापन झाल्यानंतर सर्वच पक्षामध्ये मोठी उलथापालथ होताना दिसत असतानाच आता २३ जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाची नवी दिशा आणि भूमिका ठरवणार आहेत. तसेच मनसेच्या झेंड्याचा रंग बदलणार असून त्याच दिशेने आता हालचालींना सुरुवात झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून मनसेचा झेंडा हटवून फक्त मनसेचे इंजिन ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपला भगवा झेंडा घेऊन येणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली असताना मनसेचा नवा झेंडा समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मनसेचा नवीन प्रस्तावित झेंडा निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला असून त्याला मान्यताही मिळाल्याची माहिती आहे.

- Advertisement -

असा आहे हा झेंडा

मनसेचा नवीन झेंडा समोर आला असून या झेंड्यामध्ये संपूर्ण भगवा रंग वापरण्यात आला आहे. तसेच या झेंड्याच्या मध्यभागी शिवमुद्रा तर दुसऱ्या झेंड्याच्या मध्यभागी पक्षाचे निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन दाखविण्यात आले आहे. या चिन्हाच्याखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी मनसेकडून पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरण्यात येणार असून मागील काळात राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे शिवमुद्रा असलेला झेंडा शिवजयंती, महाराष्ट्र दिन आणि अन्य मराठी सणांमध्ये वापरण्यात येणार असल्याचे कळते.

- Advertisement -

असा होता पूर्वीचा झेंडा

मनसेच्या पूर्वीच्या झेंड्यामध्ये चार रंग वापरण्यात आले होते. यामध्ये भगवा, निळा, हिरवा आणि पांढरा रंग वापरण्यात आला होता. २००६ मध्ये मनसे पक्षाच्या स्थापनेवेळी राज ठाकरेंनी या झेंड्याचे अनावरण केले होते. त्यावेळी राज यांनी झेंड्याबाबत आपली भूमिका मांडली होती. मात्र, गेल्या काही वर्षात मनसेच्या पदरी अपयश येत असल्याने मनसेने आपल्या धोरणांमध्ये बदल करण्याच ठरवले आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेदेखील आपल्या धोरणांमध्ये परिवर्तन करणार आहे.


हेही वाचा – ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणणारे संदिप देशपांडे ट्विटरवर ट्रोल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -