घरमुंबईएफडीएची फिरती 'अन्न प्रयोगशाळा'

एफडीएची फिरती ‘अन्न प्रयोगशाळा’

Subscribe

मुंबईत एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनातर्फे आता पहिली फिरती अन्न प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

मुंबईत एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनातर्फे फिरती अन्न प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, आता अन्न पदार्थांची आणि दूधाची मोबाइल फूड टेस्टिंगची लॅबमार्फत तपासणी होणार आहे. मुंबईत पहिल्या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे बुधवारी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच, राज्यात लवकरच अजून एक मोबाइल फूड टेस्टिंग लॅब दाखल होणार आहे. मुंबईसाठी स्वतंत्र मोबाइल फूड टेस्टिंग लॅब असेल, असे आश्वासन रावल यांनी दिले आहे.

ही टिम करणार अन्न तपासणी

या फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळेत एक अन्न सुरक्षा अधिकारी, एक विश्लेषक आणि परिचर यांची टीम असणार आहे. ही मोबाइल व्हॅन गर्दीच्या आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये अन्न सुरक्षा आणि अन्न भेसळीबाबत जागरूकता करणार आहे. तसेच अन्नाची देखील प्राथमिक तपासणी करणार आहे.

- Advertisement -

हे पदार्थ तपासणे शक्य

या मोबाईल टेस्टिंग व्हॅनमध्ये दैनंदिन जीवनातील अन्न पदार्थ, दूध, तूप, तेल, चहा पावडर, मसाले इत्यादी भेसळकारी पदार्थ ओळखणे शक्य होईल. या मोबाइल टेस्टिंग व्हॅनमध्ये अन्न सुरक्षेविषयी नियम आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणारी माहिती देण्यात येणार आहे.

दूध आणि अन्न भेसळ रोखण्यासाठी तसेच लोकांना चांगला आहार मिळावा‌ यासाठी एफडीएतर्फे उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणूनही फिरती अन्नपदार्थ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत आहे.  
जयकुमार रावल, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

- Advertisement -

या प्रयोगशाळेत अन्नपदार्थ तपासणीचा अहवाल लगेच मिळणार असल्याने भेसळ प्रकरणी तातडीने कार्यवाही करता येणार आहे. पूर्वी भेसळ प्रकरणी कार्यवाही झाल्यास, तपासणीचा अहवाल येण्यास किमान सात दिवस लागत असत. आता फिरत्या प्रयोगशाळेत भेसळ तपासणीचा अहवाल अर्ध्या तासातच मिळणार असल्याने त्यावर कार्यवाही करणे तसेच भेसळ रोखणे शक्य होणार आहे.

या नंबरवर संपर्क साधा

अन्न भेसळ रोखण्यासाठी काही तक्रार असल्यास नागरिकांनी १८००२२२३६५ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही एफडीएकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – एफडीएने एका महिन्यात केला ४५ हजारांचा बर्फ नष्ट

हेही वाचा – आता मॅकडोनाल्ड, बर्गर किंग आणि केएफसीवर एफडीएची नजर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -