घरताज्या घडामोडीनाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याची अंमबजावणी सुरु

नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवण्याची अंमबजावणी सुरु

Subscribe

नाट्यगृहांमध्ये नाटकाचे प्रयोग सुरु असताना प्रेक्षकांकडून होणार्‍या मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे नाट्य कलावंतांना होणारा त्रास लक्षात घेता जॅमर बसवण्याची मागणी अखेर प्रशासनाने मान्य केली आहे. परंतु नाट्यनिर्माते तसेच संस्थांकडून हरकती आणि सूचना न मागवता याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश विधी समितीने दिले होते. परंतु विधी समितीच्या मागणीला केराची टोपली दाखून नाट्यगृहात जॅमर बसवण्यासाठी प्रशासनाने थेट लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. येत्या ३० मार्चपर्यंत या हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या हरकती व सूचना जाणून घेतच प्रशासन जॅमर बसवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

नाट्यगृहांमध्ये प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधून मोबाईल फोन वाजले जात असल्याने अनेकदा कलावंतांची एकाग्रस्ता भंग होते. त्यामुळे नाटकाच्या प्रयोगात कलावंताना आपली कला यशस्वीपणे सादर करता यावी, तसेच प्रेक्षकांना विनाअडथळा त्याचा आनंद लुटता यावा, यासाठी नाट्यगृहात जॅमर बसवले जावे, अशी मागणी शिवसेना नगरसेवक आणि विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला होता. परंतु त्यामध्ये प्रशासनाने लोकांसह नाट्यनिर्माते, संस्था आदींकडून हरकती व सूचना जाणून घेत महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवला जाईल, असे नमूद केले होते. तसेच जॅमर यंत्रणा बसवल्यानंतर आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांची राहिल, अशाही जाचक अटी घातल्या होत्या. या अटी व शर्तींबाबत नगरसेवकांचे समाधान न झाल्याने, त्यांनी अटी व शर्ती रद्द करत आपल्या नाट्यगृहांमध्ये जॅमर बसवावे,असे निर्देश देत विधी समितीने हा प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवला होता.

- Advertisement -

मात्र, आपत्कालिन व्यवस्थापन विभागाच्यावतीने शनिवारी जाहिरात प्रसिध्द करून नाट्यगृहात जॅमर बसण्यासंदर्भात लोकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या अखत्यारितील नाट्यगृहामध्ये भ्रमणध्वनी प्रतिरोध यंत्रणा (मोबाईल जॅमर) बसवण्याबाबत या हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या या नाट्यगृहांमध्ये मोबाईल जॅमर बसवण्याबाबत या जाहिरातीद्वारे नागरिकांकडून हरकती तथा सूचना मागवण्यात येत आहे. नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या हरकती तथा सूचना ही जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांमध्ये मुंबई अग्निशमन दल मुख्यालय, भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र, पहिला मजला, बाबुराव जगताप मार्ग, भायखळा पश्चिम या पत्यावर लेखी स्वरुपात अथवा [email protected], [email protected] या पत्यावर पाठवण्याचे आवाहन आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगळे यांनी केले आहे.

महापालिकेची नाट्यगृह

प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली
दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले
कालिदास नाट्यगृह, मुलुंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -