घरमुंबईरिक्षातील प्रवाशांची बॅग, मोबाईल चोरणाऱ्या दुकलीस अटक

रिक्षातील प्रवाशांची बॅग, मोबाईल चोरणाऱ्या दुकलीस अटक

Subscribe

रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची विशेषता महिलांच्या बॅगेसह मोबाईल चोरी करणार्‍या एका दुकलीस खेरवाडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.

रिक्षातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची विशेषता महिलांच्या बॅगेसह मोबाईल चोरी करणार्‍या एका दुकलीस खेरवाडी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. आशिष वझुलाल मावदिया आणि मोहम्मद हुसैन सलीम शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांचा एक सहकारी पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. ही टोळी पश्चिम दुतग्रती महामार्गावर कार्यरत होती. त्यांच्या अटकेने सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांत पश्चिम दुतग्रती महामार्गावर रिक्षातून तसेच खाजगी वाहनांने प्रवाशांची बॅग आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. पाच दिवसांपूर्वी एका महिलेची बॅग पळवून नेली होती. या महिलेने खेरवाडी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातनाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकातील सोहम कदम, सचिन सूर्यवंशी, भोसले, साळवी, खोमणे, गायकवाड, मोरे, हजारे, कदम, कोईगडे, पाटील, गवळी आणि भोसले यांनी तांत्रिक माहितीवरुन सुरुवातीला आशिष तर त्याच्या जबानीतून मोहम्मद हुसैन याला पोलिसांनी अटक केली.

या दोघांनीही या गुन्ह्यांची कबुली देताना इतर पाच गुन्हे केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे सत्तावीस महागडे मोबाईल, एक पासपोर्ट, एक सोनसाखळी आदी मुद्देमाल जप्त केला. यातील आशिष आणि पळून गेलेला एक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या दोघांनाही ड्रग्ज सेवन करण्याची सवय होती. चोरीपूर्वी ते दोघेही ड्रग्जचे सेवन करीत होते. नाकाबंदीमध्ये पकडले जाऊ नये म्हणून ते एक कपड्याची जोड सोबत ठेवत होते, काही अंतरानंतर ते कपडे बदलत होते. या टोळीने तीन विदेशी नागरिकांकडील बॅग चोरी केल्याचे सांगितले. त्यांचे पासपोर्ट त्याने पोस्टच्या बॉक्समध्ये टाकले होते. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने सहा गुन्ह्यांची उकल झाली असली तरी अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -