घरमुंबई#MeToo : 'सलमान खाननं माझा लैंगिक छळ केला'

#MeToo : ‘सलमान खाननं माझा लैंगिक छळ केला’

Subscribe

मिटू मोहिमेअंतर्गत अनेक महिला सेलिब्रिटींनी पुढे सरसावत प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शकांवर आरोप केले आहेत. या मिटूच्या जाळ्यामध्ये बॉलिवूडचा दबंग खान देखील अडकला आहे. मॉडेल पूजा मिश्राने सलमान खानने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.

बॉलिवूडचा दबंग खान देखील ‘मिटू’च्या जाळ्यात अडकला आहे. सलमानवर एका मॉडेलने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. सध्या मीटूचे प्रकरण खूप गाजत आहे. या प्रकरणामध्ये अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. या यादीमध्ये आता सलमान खानच्या नावाची देखील नोंद झाली आहे. मॉडेल आणि बिग बॉसची पूर्व कंटेस्टंट पूजा मिश्राने बॉलिवूडच्या दबंग खानने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पूजा मिश्राने याआधी २०१६ मध्ये सलमान खानने बलात्कार केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. पूजाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे तो सध्या व्हायरल होत असून त्यामध्ये तिने सलमान खानवर आरोप केले आहेत.

याआधी सुध्दा केले होते आरोप

बिग बॉसची पूर्व कंटेस्टेंट पूजा मिश्राने सलमान खानवर बलात्काराचा आरोप केला होता. २०१६ मध्ये तीने एक फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये तीने सलमान खानसह त्याच्या कुटुंबियावर आरोप केले होते. सलमान खान आणि त्याचे कुटुंबिय, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबियांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. या सर्वांनी दिल्लीमध्ये ‘अभी तो पार्टी शुरु हुई है’ या टिव्ही शोच्या शुटिंग दरम्यान त्यांनी रेप केल्याचा आरोप केला होता. या आधी पूजा मिश्राने ईशा कोप्पिकरचा नवरा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याविरोधात रेपचे कट रचल्याचा आरोप केला होता.

वाचा संबंधित बातम्या – 

#MeToo: आमिर खानआधी अक्षयने सोडलेला ‘तो’ सिनेमा

#Metoo मध्ये आमिर खानची उडी; सोडला ‘हा’ चित्रपट

#MeToo नाना पाटेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

#MeToo वादळ मोदी सरकारमधील मंत्र्याचा बळी घेणार?

हे अजबच : महिलेचे महिलेविरोधातच #MeToo

#MeToo मुळे सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लटकला

#MeToo – नाना पाटेकर तनुश्री दत्ता वादामध्ये सई ताम्हणकरची उडी, सई म्हणते…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -