घरताज्या घडामोडीमॉडेल पूनम पांडेला अटक

मॉडेल पूनम पांडेला अटक

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बोल्ड बॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली पूनम पांडे हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मॉडेल आणि बोल्ड बॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली पूनम पांडे हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूनमविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यासोबत तिचा मित्र साम अहमदलाही पोलिसांनी अटक केली आहे.

नेमके काय घडले?

बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कारमधून विनाकारण मित्रासोबत भटकंती करत होती. दरम्यान, तिला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी विचारणा केली असता, ती विनाकारण भटकंती करत असल्याचे समोर आले. दरम्यान, तिला आणि तिचा मित्र साम अहमदला पोलिसांनी अटक केली.

- Advertisement -

आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कार जप्त

पूनम पांडेची आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ कार पोलिसांनी जप्त केली आहे. तिच्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती कायद्याच्या कलम १८८, २६९ आणि ५१ ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पूनम पांडे विषयी…

बोल्ड बॉलिवूड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली पूनम पांडे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. बऱ्याचदा हॉट फोटो आणि व्हिडिओंमुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. त्याचप्रमाणे तिचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पायी चालत निघालेल्या मजुरांच्या मदतीसाठी धावले ठाणे पोलीस


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -