घरताज्या घडामोडीपोलिसांच्या छाप्यातून वाचलेल्या मॉडेलवर खबऱ्याचा बलात्कार

पोलिसांच्या छाप्यातून वाचलेल्या मॉडेलवर खबऱ्याचा बलात्कार

Subscribe

पोलिसांच्या छाप्यात बचावलेल्या २८ वर्षीय मॉडेलवर एकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच कुर्ल्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.
मूळची मध्यप्रदेश राज्यातील २८ वर्षीय तरुणी दोन वर्षांपूर्वी मुंबई मायानागरीत मॉडेलिंग क्षेत्रात आपले नशीब आजमवण्यासाठी आली होती. अंधेरीतील मरोळ येथे भाडेतत्त्वावर राहणारी ही मॉडेलला ४ फेब्रुवारी रोजी रात्री एका व्यक्तीने साकिनाका येथील एका हॉटेलमध्ये ऑडिशनसाठी बोलावून घेतले होते. बळीत मॉडेल ही रात्री हॉटेलवर आली होती, त्यावेळी आणखी दोन तरुणी तेथे उपस्थित होत्या. बळीत मॉडेल थांबलेल्या हॉटेलवर नेमका मुंबई पोलिसांचा छापा पडला, या छाप्यामुळे बळीत मॉडेल सह तिघी गोंधळून गेल्या होत्या.

मात्र पोलिसांना या ठिकाणी काही आक्षेपार्ह मिळून न आल्यामुळे पोलिसांनी घटनेची नोंद साकिनाका पोलिस ठाण्यात करून या तिघीचे जवाब नोंदवून तिघीना सोडून देण्यात आले. हा सर्व प्रकार ५फेब्रुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होता, या दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या एका पोलीस खबऱ्याने बळीत मॉडेल तरुणीला सोबत घेऊन तीला धीर देत माझ्यामुळे तू वाचलीस नाहीतर तुझं काही खर नव्हते असे सांगून तिला जेवण करण्याच्या निमित्ताने कुर्ला पश्चिम एलबीएस रोड या ठिकाणी कल्पना सिनेमागृह येथे घेऊन आला.

- Advertisement -

दोघांनी तेथे जेवण करून जवळच असणाऱ्या हॉटेलवर आणून आराम करून सकाळी जा असे सांगून तिला हॉटेलच्या खोलीवर आणले आणि तिची इच्छा नसताना त्याने तिच्यावर बलात्कार केला. बळीत मॉडेल ला सकाळी जाग आल्यावर तिने हॉटेलमधून थेट साकिनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. साकिनाका पोलीसानी तिच्या तक्रारीवरून जोहेब नावाच्या पोलीस खबऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे ठिकाण विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे गुन्हा पुढील तपासासाठी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -