घरताज्या घडामोडीFarmersProstest : हे तर 'हिटलर'चे सरकार - प्रकाश आंबेडकर

FarmersProstest : हे तर ‘हिटलर’चे सरकार – प्रकाश आंबेडकर

Subscribe

मोदी सरकारने शेतकऱ्यांविरोधातील रणनिती बदलली आहे. शेतकरी आंदोलनात अनेक मार्गाने व्यत्यय आणत त्याला बाधा पोहचवण्याचे काम हे मोदी सरकारमार्फत होत आहे. म्हणूनच आम्ही लोकांना अलर्ट करत आहोत, की हे तर हिटलरचे सरकार आहे. लोकशाहीला या लोकांना माहित नाही आणि लोकशाही हे लोक मानत नाही अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार हुकुमशाही सरकार आहे असे सांगतानाच त्यांनी मोदींच्या सरकारचा उल्लेख हिटलरचे सरकार असाही केला आहे. सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे नव्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलन पाहता केंद्र सरकार अनेक पद्धतीने हे आंदोलन कसे फोडता येईल यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे. कशा वेगवेगळ्या पद्धतीने या शेतकऱ्यांच्या आंदोलनात अडथळे आणता येतील यासाठीच्या शकला मोदी सरकारकडून लढवण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Modi government used water jets on women farmers to disturb famers peaceful protest says prakash ambedkar)

- Advertisement -

मोदी सरकारने आंदोलन फोडून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामध्ये २६ जानेवारी उसळलेल्या हिंसाचारतही भाजपकडून लोक पाठवण्यात आल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. २६ जानेवारीच्या आंदोलनात काही लोकांना पाठवून शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

- Advertisement -

यूपी नगर निगमचा पाण्याच्या टॅंकर हा प्रदर्शनात असणाऱ्या महिलांच्या अंगावर चालवण्यात आला. त्यामध्ये अनेक महिला जखमी झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या महिलांची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमुद केले आहे. आंदोलनात बाधा पोहचवण्याचा हादेखील एक प्रकार मोदी सरकारकडून समोर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणूनच या हुकुमशाही सरकारची वागणूक बदलावी यासाठी आम्ही दिल्ली प्रदेश आणि परिसरातील लोकांना लाखोच्या संख्येत शेतकरी आंदोलनासोबत उभे राहण्याची विनंती करत आहोत असे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -