Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण गुजरात निवडणूक मोदी आणि शहा यांनी हरलेली गावं जिंकून दाखवली

मोदी आणि शहा यांनी हरलेली गावं जिंकून दाखवली

Subscribe

गुजरातमधील वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे गाव तर मानसा हे गृहमंत्री अमित शहा यांचे गाव. या दोन्ही ठिकाणी २०१७ मध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. हा पराभव मोदी-शहा यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळेच २०२० च्या निवडणुकीसाठी मोदी-शहा यांनी या दोन्ही मतदार संघावर विशेष लक्ष दिले.

अहमदाबाद: गुजरात निवडणुकीचे किंग मेकर मोदी-शहा यांचे देशभरातून कौतुक झाले. मात्र गुजरात निवडणुकीतील दोन मतदार संघातील निकाल मोदी-शहा यांना अधिक सुखावणारा होता. कारण ते दोन्ही मतदार संघ हे मोदी-शहा यांच्या गावचे होते व त्या ठिकाणी गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करत मोदी-शहा यांनी आपल्या गावची सत्ता खेचून आणली.

गुजरातमधील वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे गाव तर मानसा हे गृहमंत्री अमित शहा यांचे गाव. या दोन्ही ठिकाणी २०१७ मध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. हा पराभव मोदी-शहा यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळेच २०२० च्या निवडणुकीसाठी मोदी-शहा यांनी या दोन्ही मतदार संघावर विशेष लक्ष दिले.

- Advertisement -

वडनगरमधील उंझा मतदार संघातून किरीट पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदार संघातून उमेदवारी देण्यावरुन भाजपमध्ये मतभेद झाले होते. अखरे येथून किरीट पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. किरीट पटेल हे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे स्वयंसेवकही प्रचारात उतरले होते. तसेच पक्षातंर्गत गटबाजीलाही यामुळे आळा बसला व किरीट पटेल हे निवडून आले. या मतदार संघातून २०१७ मध्ये काँग्रेसच्या डाॅ. आशा पटेल निवडून आल्या होत्या.

गृहमंत्री शहा यांचे गाव असलेल्या मानसा मतदार संघात तर गेली दहा वर्षे काँग्रेसचाच बोलबाला होता. त्यामुळे मंत्री शहा यांनी भाजपचा उमेदवार जिंकवून आणण्याठी विशेष नियोजन केले. या मतदार संघात पाटीदार व ठाकोर समाजाचे मतदार अधिक आहेत. त्यांची मते मिळविण्यासाठी जयंतीभाई पटेल यांना उमेदवारी देण्यात आली. महत्त्वाचे म्हणचे जयंतीभाई पटेल यांची उमेदवारी उशिरा जाहीर करण्यात आली होती.

- Advertisement -

या दोन्ही मतदार संघात केलेल्या नियोजनामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करण्यात भाजपला यश आले. येथील विजयामुळे मोदी-शहा यांचा आनंद द्विगुणीत झाला. गुजरातमधील निकालामुळे पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांचे आभार मानले.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -