घरमुंबईमोहन डेलकर आत्महत्या प्रकरण: दोषीवर कारवाई करणार - अनिल देशमुख

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण: दोषीवर कारवाई करणार – अनिल देशमुख

Subscribe

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दादरा हवेली येथील खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी डेलकर आत्महत्या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी देशमुख यांनी आत्महत्येची चौकशी करण्याचे आश्वासन सचिन सावंत यांना दिले.

अनिल देशमुख काय म्हणाले?

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येने विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले, अशा व्यक्तीने आत्महत्या केल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होते. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. यामागे काय कारण असेल? तसेच त्यांनी ज्या प्रशासकीय अधिकार्‍यांची नावे दिली आहेत, त्यापैकी कोणी जबाबदार आहे का? दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल हे जबाबदार आहेत का? त्यांच्या दबावाखाली आत्महत्या केली का? याचा आम्ही तपास करू, असे अनिल देशमुख म्हणाले. प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का? प्रफुल्ल पटेल यांचा प्रशासनावर दबाव होता म्हणून मुंबईत आत्महत्या केली का? तिथे न्याय मिळणार नाही म्हणून मुंबईत आत्महत्या केली का?, असे अनेक सवाल उपस्थित होतात. मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू, असे गृहमंत्री म्हणाले.

- Advertisement -

स्थानिक भाजप नेत्यांकडून डेलकर यांना त्रास

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याविषयी बोलताना डेलकर यांना स्थानिक भाजप नेत्यांकडून त्रास दिला जातोय. खोट्या केसेस टाकल्या जातायत अशा तक्रारी यापूर्वी केल्या असल्याची माहिती दिली. भाजपचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचे नाव डेलकर यांनी आपल्या 15 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. प्रफुल्ल पटेल सध्या दादरा नगर हवेलीत प्रशासक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -