मोहीत कंबोज यांना न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

Mohit Kamboj

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची मुंबई पोलिसांची (MUMBAI POLIE) अर्थिक गुन्हे शाखा चौकशी करत आहे.

52 कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप –

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत सुमारे 52 कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या (MUMBAI POLIE) आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणात मोहित कंबोज यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता होती. ही कारवाई टाळण्यासाठी मोही कंबोज यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती.

इंडियन ओव्हरसिज बँकेकडून घेतले होते कर्ज –

इंडियन ओव्हरसिज बँकेकडून कंबोज यांनी हे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कारणासाठी कर्ज घेतले होते त्यासाठी त्याचा वापर केला नाही आणि ते अन्यत्र वळवण्यात आले. ही रक्कम परत करण्यात आलेली नाही, अशी तक्रार आल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कंबोज यांच्यासह अन्य दोन संचालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आरोपांचे खंडन करत कंबोज यांनी ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केला आहे.