Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मोहित कंबोज करणार संजय राऊतांवर ५० पैशांचा मानहानीचा दावा

मोहित कंबोज करणार संजय राऊतांवर ५० पैशांचा मानहानीचा दावा

Subscribe

संजय राऊत यांनी कंबोज यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ज्या पबमध्ये मोहित कंबोज बसलेले होते. त्याठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन देखील करण्यात येते, त्यामुळे या प्रकरणाची राज्याच्या गृहमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबई : रविवारी पहाटे एका पबमध्ये भाजपचा नेता गोंधळ घालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकरणात भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bharstiya) यांचे नाव समोर आले आहे. पब बंद होण्याची वेळ रात्री 1 वाजताची असताना देखील मोहित कंबोज यांनी पदाचा गैरवापर करत पहाटेपर्यंत पब चालू ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. पण या प्रकरणी संजय राऊत यांनी कंबोज यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. ज्या पबमध्ये मोहित कंबोज बसलेले होते. त्याठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन देखील करण्यात येते, त्यामुळे या प्रकरणाची राज्याच्या गृहमंत्र्यांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर मानहानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. मोहित कंबोज यांनी याबाबतचे एक ट्वीट केले आहे. तसेच या प्रकरणाची स्पष्टता देणारे पत्र देखील कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटला जोडले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कंबोज हे संजय राऊत यांच्यावर फक्त 50 पैशांचा दावा करणार आहेत. याबाबत ट्वीट करत मोहित कंबोज यांनी लिहिले आहे की, “My Press Note On Sanjay Raut Baseless Allegations ! I Am Filling 50 Paise Criminal Defamation On Sanjay Raut क्यों की उसकी औक़ात 1 Rupees की भी नहीं है !”

- Advertisement -

संजय राऊत यांची लायकी एक रुपयाची देखील नसल्याने त्यांच्यावर फक्त 50 पैशांचा मानहानीचा दावा करत असल्याची माहिती कंबोज यांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्याने आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. तर कंबोज यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, शनिवारी रात्री ते त्यांची बायको अक्षा हिच्यासोबत मित्राच्या वाढदिवसासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. पण नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी कोणतीही माहिती न घेता त्या फॅमिली रेस्टॉरंटला डांस बार म्हणून घोषित केले. राऊत यांना कायमच खोटे आरोप करण्याची सवय लागली आहे. पण यावेळी त्यांनी अत्यंत खोटे आणि चुकीचे आरोप लावले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – आधारशी लिंक मोबाईलची पडताळणी करणे झाले सोपे, UIDAI कडून नवीन सुविधा सुरू

या प्रकरणी संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतर मोहित कंबोज यांनी त्यांना या पत्राच्या माध्यमातून सल्ला देत सांगितले आहे की, माझ्याकडे तुमच्या अनेक लोकांच्या विरोधात अनेक प्रकरणांचे पुरावे आहेत. ते पुरावे जर का मी दाखवले तर तुम्ही लोक कोणाला तोंड दाखवायच्या देखील लायकीचे राहणार नाही. त्यामुळे चुकीचे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी मी संजय राऊत आणि काँग्रेस नेता अतुल लोंढे यांच्याविरोधात 50 पैशांचा मानहानीचा दावा दाखल करणार आहे. कारण या दोघांचाही लायकी एक रुपयाचा देखील नाही, असे लिहित कंबोज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisment -