Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मोहित कंबोज यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर त्यांच्या बायकोने दिले उत्तर; म्हणाल्या...

मोहित कंबोज यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर त्यांच्या बायकोने दिले उत्तर; म्हणाल्या…

Subscribe

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गृहमंत्री आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याचीही मागणी केली होती. यावेळी संजय राऊत यांनी आरोप केला होता की, रात्री साडेतीन वाजता मोहित कंबोज बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत. या आरोपाला मोहित कंबोज यांची बायको अक्क्षा कंबोज (Aksha Kamboj) यांनी ट्विटरद्वारे उत्तर दिले आहे.

अक्क्षा कंबोज म्हणाल्या की, मोहित कंबोज भारतीय कौटुंबिक मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये गेले होते. त्यांच्यासोबत मी एकमेव मुलगी होते. त्यामुळे कोण काय म्हणत आहे, याने फरक पडत नाही. खोट्या बातम्या आणि चुकीच्या अफवा कधीही टिकणार नाहीत. अक्क्षा कंबोज यांनी उत्तर दिले असले तरी मोहित कंबोज याप्रकरणी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच आता संजय राऊत कंबोज प्रकरणी आणखी काही आरोप करणार का? हे पाहावे लागले.

- Advertisement -

दरम्यान, संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन कांबळे यांनी कंबोज यांच्याबाबत दावा करताना म्हटले की, खार पश्चिम येथील लिंक रोड परीसरातील रेडिओ बार या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत. कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?” असा प्रश्नही त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून विचारला आहे. “बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत”, असंही ते म्हणाले. “आमच्या सभा साडेदहा वाजताच बंद करता आणि यांना साडेतीन वाजेपर्यंत मुलीसोबत कसे नाचू देता असा प्रश्नही कांबळे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

सचिन कांबळे यांचा हा व्हिडीओ संजय राऊत यांनी ट्वीटरद्वारे शेअर केला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि नार्कोटिक्स ब्युरोला टॅग करत त्यांनी म्हटले की, “महाशय आपण काय कारवाई केली ते जनतेला कळू द्या. येथे अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याची माहिती आहे. भाजपचे हिंदुत्व या ठिकाणी काय करत होते? रेडिओ बारमधील सीसीटीव्ही फुटेज लगेच ताब्यात घ्या आणि खोक्यांचे राज्य अंमली पदार्थांचे राज्य होऊ नये”, असे ट्वीट राऊतांनी केले आहे.

- Advertisement -

यानंतर संजय राऊत यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, या व्हिडीओमध्ये रेडिओ बारमधील दृश्य दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना संजय राऊत यांनी म्हटले की, “पहाटे 3.30, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवटपर्यंत पाहा. पोलीस हतबल आहेत.. हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलीस आयुक्तांना पाठवत आहे.. मी वाट पाहतोय पोलीस काय कारवाई करत आहेत.. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -