घरताज्या घडामोडीसकारात्मक! मोनिका मोरेच्या जिद्दीला यश, ऑपरेशनच्या ७ महिन्यांनंतर हातांची ताकद परत...

सकारात्मक! मोनिका मोरेच्या जिद्दीला यश, ऑपरेशनच्या ७ महिन्यांनंतर हातांची ताकद परत येतेय

Subscribe

मोनिका आता ५० टक्के क्रियांना प्रतिसाद देत आहे.

घाटकोपर येथे राहणाऱ्या मोनिका मोरे या तरुणीचा २०१४ मध्ये रेल्वे अपघात झाला. या अपघातात तिला तिचे दोन्ही हात गमवावे लागले. ऑगस्ट २०२०मध्ये मोनिकाला खरे खुरे हात बसवण्यात आले. तिच्यावर हात प्रत्यारोपणाची शस्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्रक्रियेनंतर मोनिकाचे हात शरीर स्विकारेल की नाही अशी शंका होती. मात्र मोनिकाचे दोन्ही हात तिच्या शरीराने स्विकारले आहेत. योग्य उपचार आणि फिजिओथेरपीमुळे मोनिकाच्या दोन्ही हातांची ताकद परत येत आहे. मोनिका आता काही प्रमाणात वस्तू उचलू शकते त्याचप्रमाणे स्वत: हातांची हालचालही करु शकते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिका आता ५० टक्के क्रियांना प्रतिसाद देत आहे. त्याचप्रमाणे ६ वर्षे मोनिकाला हात नव्हते त्यामुळे मोनिकाचा मेंदू तिचे हात विसरला आहे. फिजिओथेरपीच्या साहाय्याने हातांच्या संवदेना जागृत करण्याचे काम सुरु आहे, असेही मोनिकाच्या डॉक्टरांनी सांगितले.

ऑगस्ट २०२०मध्ये मुंबई परळच्या ग्लोबल रुग्णालयात मोनिकाच्या हातावर शस्रक्रिया करण्यात आली. मोनिकाच्या हातांवर शस्रक्रिया करुन ७ महिने होऊन गेले आहेत. फिजिओथेरपीमुळे मोनिकाने आतापर्यंत खुप चांगली प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे तिच्या शरीराने तिचे नवे हात स्विकारले आहेत. फिजिओथेरपीच्या सहाय्याने हातांमध्ये संवेदना आणण्याचे काम आम्ही करत आहोत. पुढील २-३ महिन्यांमध्ये मोनिका तिच्या हातांनी सर्वप्रकारची कामे करु शकेल असे तिच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

२०२०मध्ये चेन्नईच्या ग्लोबल रुग्णालयातील एका ब्रेनड डेड तरुणाचे हात मोनिकाला देण्यात आले. त्या तरुणाच्या कुटुंबियांच्या होकारानंतर मोनिकाला हात देण्यात आले. मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात मोनिकावर १५ तासांहून अधिक वेळ हात प्रत्यारोपणाची शस्रक्रिया करण्यात आली.


हेही वाचा – मुंबईकरांना कोरोनाचा विसर, गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी दादर फुलमार्केटमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -