मोनोरेल विस्कळीत; चेंबूर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल सेवा बंद पडली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोनोरेलच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

Monorail delayed due technical problem chembur railway station
मोनोरेल विस्कळीत

मुंबईसह उपनगरामध्ये रविवार पासून पडलेल्या रिमझिम पावसानंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरी बसरत आहेत. तर सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, वरळी, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, ठाणे, डोंबिवली, सायन, घाटकोपर,वसई, नालासोपारा अशा अनेक परिसरांमध्ये सध्या पाऊस पडत आहे. तर परळ, लोअर परेल, लालबाग या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका मुंबईत मोनोरेला बसला असून मोनोरेल सेवा विस्कळीत झाल्याचा प्रकार घडला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत

चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेल अडकल्याचा प्रकार घडला आहे. चेंबूर स्थानकाजवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल सेवा बंद पडली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मोनोरेलच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे. याआधी देखील अनेकदा मोनोरेलमध्ये तांत्रित बिघाड झाल्याने सेवा ठप्प झाल्याच्या घटना घडल्या होत्या.