पावसाळ्यात फिरायला जायचा प्लॅन करताय? मग ‘हे’ आहेत मुंबईतील Best Places

तुम्हालाही पावसाळ्यात फिरण्यासाठी मुंबईजवळील आणखी काही बेस्ट ठिकाणं माहिती असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा

Monsoon 2022 best places to visit during monsoon in near mumbai

गेल्या तीन महिन्यांपासून उन्हाची काहिली सहन करणारे नागरिक आता पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. या पावसात तुम्हीही यंदा फिरायला जाण्याचे प्लॅन (Picnic Spot) करत असालच. कारण पावसात आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर, कुटुंबियांबरोबर किंवा मित्रमंडळींसोबत फिरण्याची एक वेगळीच मज्जा असते. म्हणून आज तुम्हाला आम्ही मुंबईतील अशी काही हटके ठिकाणांची माहिती देणार आहोत ज्या ठिकाणांना तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता. मुंबई हे एकमेव ठिकाण आहे ज्याकडेला समुद्रकिनारा, किल्ले, पठार अशा सर्व प्रकारच्या निसर्गाच्या छटा अनुभवण्यास मिळतात. म्हणून पावसाळ्यातील मुंबईजवळील ही ठिकाणं दरवर्षी अनेकांना खुणावत असतात. (Monsoon Best Picnic Spot In Mumbai)

कोंडेश्वर धबधबा- बदलापूर

बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असलेला हा धबधबा पावसाळ्यात पिकनिकसाठी फेमस आहे. शंकराच्या मंदिरामुळे या धबधब्याला कोंडेश्वर हे नाव पडले. पंधरा फुट अंतरावर कोसळणाऱ्या या नयनरम्य धबधब्यासाठी भिजण्याची मज्जा लुटण्यासाठी स्थानिक तसेच मुंबई आणि मुंबईबाहेरून अनेक पर्यटक दरवर्षी येतात. याठिकाणी जाण्यासाठी स्वत;ची गाडी असले तर बेस्टचं. नाही तर बदलापूरला उतरून टमटम आणि इतर खाजगी वाहनांचा पर्याय आहे. (monsoon best place in mumbai)

जव्हार- पालघर 

मुंबई जवळील पालघरमधील जव्हार हे ठिकाण पावसाळ्यात फिरण्यासाठी आणखी एक उत्तम प्लेस आहे. याठिकाणी राजवाडे, किल्ले यासह समुद्र किनारा पाहण्यासारखा आहे. आजही या ठिकाणी वारली, कोलचा आणि कुकाना संस्कृती जपली जाते. याशिवाय जव्हारमध्ये फिरण्यासाठी आणखी स्थळे म्हणजे धबधबा, जय विलास पॅलेस, सनसेट पॉइंट, शिरपमाल आणि हनुमान पॉईंट ही आहेत.

माळशेज घाट – कल्याण – मुरबाड मार्ग

पावसाळ्यात पिकनिक आणि ट्रेकर्ससाठी माळशेज घाट खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी डोळ्यात भरणारे धबधबे, भव्य किल्ले आणि नयनरम्य ठिकाण पाहण्यासारखे आहे. मुंबईपासून जवळच हा घाट असल्याने ठाणे, पुणे तसेच अनेक ठिकाणांहून पर्यटक याठिकाणी येत असतात. माळशेज घाटात माळशेज धबधबा, पिंपळगाव जोगा धरण, हरिश्चंद्रगड आणि अजोबा हिल किल्ला हे पाहण्यासारखे आहे. याठिकाणी फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठीही पर्यटक गर्दी करतात.

कान्हेरी – बोरिवली

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात पावसाळ्यातील एक निवांत पिकनिक स्पॉट म्हणजे बोरिवलीतील कान्हेरी गुंफा. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात अनेक धबधबे आणि नयनरम्य निसर्ग दृष्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. या ठिकाणी जाण्यासाठी सायकल किंवा गेटवरून बसची सुविधा उपलब्ध आहे.

भिवपुरी धबधबा – भिवपुरी

मध्य रेल्वेच्या भिवपुरी स्थानकाहून शेतातून जाणाऱ्या पायवाटेने अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याकडे जाता येते. माथेरानमधून वाहणारा हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक विकेंड्सला मोठी गर्दी करतात. याठिकाणी अनेक हॉटेल्स असून राहण्यासाठी उत्तम सोय आहे.

(तुम्हालाही मुंबईजवळील पावसाळ्यात फिरण्यासाठी आणखी काही बेस्ट ठिकाणं माहिती असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा.)