Monsoon: पुढील २-३ तासात मुंबई,ठाण्यासह पालघरमध्ये पावसाची शक्यता

२९ जुलैपर्यत पाऊस पडण्याचा अंदाज असून त्यानंतर काही काळ पावसाला ब्रेक

Monsoon Update in india

पुढील २-३ तासात मुंबई,ठाण्यासह पालघरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि रायगडमध्ये देखील हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. ठाण्यात देखील काही वेळापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.  २९ जुलैपर्यत पाऊस पडण्याचा अंदाज असून त्यानंतर पुढील काही काळ पावसात खंड पडेल. त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पाऊस पडेल म्हणजेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सकाळी १० वाजता ताज्या उपग्रह प्रतिमेत कर्नाटक तेलंगणा, सीएपी आणि लगतच्या महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भाच्या काही भागात घनदाट ढग असल्याचे दिसून आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. (Monsoon: Chance of rain in Mumbai, Thane and Palghar in next 2-3 hours)

यंदा पाऊस एक दिवस आधीच राज्यात दाखल झाला. पहिल्या दोन आठवड्यातच पावसाने राज्यात दमदार बॅटिंग केली. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली पहायाला मिळाली. गेल्या एक ते दीड आठवड्यांपासून राज्यात पाऊस झाला नाही. २९ जून पर्यंत राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनला ब्रेक लागणार आहे. दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या रिझमिझ सरी पडायला सुरुवात झाली आहे. मुंबई सह ठाणे,रायगड आणि पालघर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील २-३ तास पाऊस सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – Corona Update : कोविड रुग्णांसाठी मुंबई महापालिका उभारणार ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट; २१ कोटींचा खर्च