घरताज्या घडामोडीकोरोना पाठोपाठ मुंबईवर आणखी एक संकट, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान!

कोरोना पाठोपाठ मुंबईवर आणखी एक संकट, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान!

Subscribe

कोरोनाच्या संकटाबरोबरच आता मुंबईवर आणखी संकट हजर झालं आहे. कोरोनानंतर आता मुंबईत मलेरियाची साथ पसरली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे अधिक रूग्ण सापडले आहेत. मुंबईत गेल्या वर्षी जुलै महिन्यात ४३८ मलेरियाचे रूग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे ८७२ रुग्ण सापडले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही रूग्णांना कोरोनाचीही लागण झाली होती.

कोरोनाबरोबरच मलेरियाची रुग्णसंख्या दुप्पट होत आहे. यंदाही जुलैमध्ये मलोरियाचा आकडा दुप्पट वाढला आहे. त्याचबरोबर कोरोनाचं संकटही दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मुंबईत मलेरियापाठोपाठ डेंग्यूचे रुग्णही आढळले आहेत. गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत डेंग्यूचे २९ रुग्ण सापडले होते. जुलैमध्ये ११ रुग्ण सापडले आहेत. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी डेंग्यूचेही रुग्ण सापडत असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईत मलेरियाचे रुग्ण सापडत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता पालिकेकडून मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होऊ नयेत म्हणून झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्ये फवारणी केली आहे. अडगळीतील सामानही हटवण्यात आले आहे. मात्र, बांधकांमांच्या ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांना फवारणी करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी फवारणी होत नाही, परिणामी मलेरिया आणि डेंग्यूच्या अळ्या निर्माण होतात. असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -