Monsoon Update: मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका; पुढील ३ तास महत्त्वाचे

Cyclone Gulab 13 Dead After Heavy Rain, Floods In Maharashtra 560 rescue operation
Cyclone Gulab : राज्यात पूरस्थिती, वीज कोसळून १३ जण ठार, बचावकार्यात ५६० जणांची सुटका

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतूक मंदावली आहे. मुंबईकरांसाठी पुढील ३ तास खूप महत्त्वाचे आहे. मुंबईत पुढील ३ तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच संध्याकाळी ४.२६ वाजता ४.०८ मीटरची समुद्राला देखील भरती येणार आहे. या अनुषंगाने मुंबईकरांनी विनाकारण बाहेर पडून नका, असे आवाहन हवमान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्याचनुसार लोकल स्टेशनवर देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सायन, कुर्ला स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे २० ते २५ मिनिटे उशिराने लोकलं धावत आहे. अनेक ट्रेन मधेच थांबल्यात आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना पट्टरीवरून चालत मार्गस्थ व्हावे लागले आहे.

वाहतूकीचा वेग मंदावला

नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने वाहतूक मंदावली आहे. सायन-पनवेल महामार्गावरील वेग मंदावला आहे. वाहन चालकांना अति सावध गतीने वाहनं हाताळावी लागत आहेत. पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या ३ तासातील मुंबईतील पावसाची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. अंधेरीमध्ये सरासरी १२५ मिलीमीटर, वांद्र पश्चिम परिसरा ८० मिली, बोरिवलीमध्ये ६४ मिली पावसाची नोंद झाली आहे.

पाहा मुंबईतील मुसळधार पावसाचे दृश्य 

चुनाभट्टी रेल्वे स्थानकातून रेल्वे रुळावर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.

आज पहाटे मुसळधार पावसामुळे मुंबईच्या काही भागांत पाणी साचले आहे. हिंदमाता, सायन, वडाळा, दादर, वरळी येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. खालील दृश्य वडाळा येथील आहे.

मुंबईच्या गांधी बाजाराच्या परिसरात देखील पाणी साचले आहे.

मुसळधार पावसाने मुंबईला चांगलं झोडपलं आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेरील हे दृश्य पाहा..