Eco friendly bappa Competition
घर मुंबई व्हिएतजेट एअरलाईन्सचे 100 हून अधिक प्रवासी रात्रीपासून मुंबई विमानतळावर अडकून

व्हिएतजेट एअरलाईन्सचे 100 हून अधिक प्रवासी रात्रीपासून मुंबई विमानतळावर अडकून

Subscribe

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल रात्रीपासून प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. गुरुवारी रात्रीपासून 100 हून अधिक प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. विमानात तांत्रिक अडचण असल्याचे सांगत सर्व प्रवाशांना तत्काळ विमानातून खाली उतरवले, पण हे विमान अद्याप उड्डाण झालेले नाही. (More than 100 passengers of Vietjet Airlines stranded at Mumbai airport since night)

व्हिएतजेट एअरलाईन्सने विमान व्हिएतनामच्या हो ची मिन्हला रात्री 1 वाजता रवाना होणार होते. त्यामुळे सर्व प्रवाशांना विमानात बसायलाही सांगितले, पण थोड्या वेळाने विमानात तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात आले आणि प्रवाशांना तात्काळ विमानातून खाली उतरवण्यात आले. या प्रवाशांमध्ये वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व प्रवासी विमानतळावर विमान रिकव्हर होण्याची वाट पाहत आहेत.

- Advertisement -

व्हिएतजेटची ही व्हिएतनाम-ला जाणारी विमानसेवा, जी गुरुवारी रात्री 1 वाजता हो ची मिन्हला रवाना होणार होती, पण ती अद्याप उड्डाण झालेली नाही आणि उड्डाणाची माहिती प्रवाशांना उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे 100 हून अधिक प्रवाशांना मुंबई विमानतळावर विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

एका प्रवाशाने नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट करत “व्हिएटजेटचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याने आरोप केले आहेत की, कर्मचाऱ्यांचे असभ्य वर्तन आणि वारंवार विलंब होऊनही एअरलाइनने आम्हाला कोणतीही सुविधा दिली नाही.

100 हून अधिक प्रवासी अडचणीत आहेत
मुंबई विमानतळावर 100 हून अधिक प्रवाशांनी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली नसल्याची तक्रार आहे. 12 तास अडकून पडल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे. काही जण याठिकाणी बेशुद्धही पडले आहेत. विमान कधी सोडणार याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे. ऑनलाइन विमानाची वेळ 25 मे आणि 27 मेची आहे.

कोरियातही व्हिएतजेट एअरलाईन्सविरोधात तक्रारी
दक्षिण कोरियामध्ये उड्डाणे रद्द करणे आणि पैसे परत करण्यास नकार दिल्याने व्हिएतजेट एअरलाईन्सविरोधात 329 तक्रारी करण्यात आल्या आहेत. कोरिया इकॉनॉमिक डेलीच्या वृत्तानुसार, कोरिया कन्झ्युमर एजन्सीला यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत व्हिएतजेट एअरलाईन्सशी संबधित तक्रारी मिळाल्या आहेत.

एअरलाईन्सकडून ऑफर पण प्रवाशांचे नुकसान
2023 च्या पहिल्या तिमाहीत व्हिएतजेट एअरच्या तक्रारींमध्ये 127 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी जून 2021 पासून एअरलाईन रद्द केलेल्या तिकिटांच्या बदल्यात ग्राहकांना क्रेडिट पॉइंट ऑफर करत आहे. विशेष म्हणजे एअरलाईन स्वत: तिकीट रद्द केल्यावर ही ऑफर देत आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना मिळालेले क्रेडिट पॉइंट 1 ते 2 वर्षात संपतील आणि ते हस्तांतरित करता येणार नाहीत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. परंतु जर ग्राहकाने स्वतः तिकीट रद्द केले, तर त्याला त्याऐवजी प्रति व्यक्ती ४५,००० वॉन ($४०) द्यावे लागत आहेत. एकूणच, प्रत्येक बाबतीत प्रवाशांना तोटा सहन करावा लागत आहे.

 

- Advertisment -