घरमुंबईईडीकडून वर्षभरात 505 टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांची नोंद; 'या' कंपन्या रडारवर

ईडीकडून वर्षभरात 505 टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांची नोंद; ‘या’ कंपन्या रडारवर

Subscribe

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गेल्या चार वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षभरात तब्बल 505 टक्क्यांहून अधिक गुन्हे नोंदविल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ईडीने 2018-19 या आर्थिक वर्षात एकूण 195 गुन्हे नोंदविले, तर 2021-22 या वर्षामध्ये 1,180 गुन्ह्यांची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, केवळ गुन्हेच नाही तर छापेमारीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याची माहिती आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2004 ते 2014 या कालावधीत ईडीने देशभरात 112 ठिकाणी छापेमारी केली असून 5,346 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. याउलट 2014 ते 2022 या कालावधीमध्ये ईडी अधिकाऱ्यांकडून देशभरात तब्बल 2,974 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीतून तब्बल 95 हजार 432 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

मोबाइल ॲप, क्रिप्टो करन्सी कंपन्यामध्ये गैरव्यवहार
गेल्या वर्षापासून मोबाइल ॲप, क्रिप्टो करन्सी आदी कंपन्याच्या माध्यमांतून होणाऱ्या व्यवहारांत देखील मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मोबाइल गेमिंगच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचे तपास यंत्रणांनी समोर आणल्यानंतर मोबाइल ॲपच्या माध्यमातून लोकांना कर्ज देत त्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर देखील ईडीने कारवाईला सुरूवात केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 600 पेक्षा जास्त कंपन्यांची कसून चौकशी सुरू आहे.

ईडी, सीबीआय विरोधात विरोधक सुप्रीम कोर्टात
गेल्या काही महिन्यांत ईडी आणि सीबीआयकडून फक्त विरोधकांवर वारंवार होणाऱ्या चौकशीमुळे विरोधी नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षातील नेते करत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वात 14 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मिळून 24 मार्च 2022 ला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून या याचिकेवर उद्या (5 एप्रिल) सुनावणी पार पडणार आहे. गेल्या काही महिन्यात केंद्राने विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष केले असून या प्रकरणांमध्ये न्यायालयाने अटक आणि जामीन मंजूर करण्याच्या बाबतीतले दिशानिर्देश यंत्रणांना द्यावे, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -