घरताज्या घडामोडी1993 Blast Case: मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा पाकिस्तानात...

1993 Blast Case: मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझीचा पाकिस्तानात मृत्यू

Subscribe

मुंबईतील १९९३च्या सीरिअल बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी एक सलीम गाझी होता, ज्याने देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवले होते.

मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा निटकवर्तीय सहकारी सलीम गाझीचा पाकिस्तानात मृत्यू झाला आहे. शनिवारी पाकिस्तानच्या कराचीमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, गाझीचा मृत्यू हृदयविकाराने झाला. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजाराने तो ग्रस्त होता.

- Advertisement -

मुंबईतील १९९३च्या सीरिअल बॉम्बस्फोटातील आरोपींपैकी एक सलीम गाझी होता, ज्याने देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवले होते. ज्यामध्ये २५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७१३ जण जखमी झाले होते. सलीम गाझीवर स्फोट घडवून आणल्याचा आरोप होता. मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर तो दाऊद इब्राहिमच्या टोळीतील इतर सदस्यांसोबत पाकिस्तान पळून गेला होता. तेव्हापासून भारतीय अधिकारी त्याला पकडल्यात अपयशी ठरले.

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत दोन तास वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट होत होते. संपूर्ण देश हादरला होता. मुंबईतील हा बॉम्बस्फोट देशातील सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या बॉम्बस्फोटाच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या हल्ल्यात अनेक आरोपी होते. ज्यामधील अबू सालेम आणि फारुख टकला सारखे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तसेच या हल्ल्याचा सूत्रधार अबू सालेमसह इतर अनेक आरोपींना विशेष टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. परंतु या हल्ल्यामागील सर्वात मोठे नाव दाऊद इब्राहिमचे होते, जो अजूनही अटकेपासून दूर आहे. दाऊदने हा हल्ला का केला यामागे देखील एक कहानी आहे. दरम्यान या हल्ल्याचे कारण बाबरी मशिद हटवल्याचे म्हटले जाते. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर मुंबईसह देशभरात दंगली उसळल्या होत्या. माहितीनुसार, १९९३च्या बॉम्बस्फोटात तब्बल २७ कोटी रुपयांहून अधिक संपत्तीचे नुकसान झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Online Food Delivery : ऑनलाइन पिझ्झाचा रिफंड पडला महागात ; मुंबईकर महिलेला ११ लाखांचा गंडा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -