घरताज्या घडामोडी'सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचे असते अधिकाऱ्यांनी नाही'

‘सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचे असते अधिकाऱ्यांनी नाही’

Subscribe

'सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचे असते अधिकाऱ्यांनी नाही', अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारवर केली आहे.

‘हे सरकार अधिकारी चालवतात की मुख्यमंत्री चालवताता हा प्रश्न पडला आहे’, अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारवर केली आहे. तसेच ‘या मराठा तरुणांना न्याय मिळत नसेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाजाला बाजूला ठेवू नका,’ असा इशारा देखील त्यांनी दिला. ‘३५ दिवस आंदोलन करुनही का पर्याय निघाला नाही, सरकार हे मुख्यमंत्र्यांनी चालवायचे असते की अधिकाऱ्यांनी’, असा सवाल उपस्थित केला. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीमुळे साडेतीन हजार तरुणांचे भवितव्य धोक्यात आल्याचे देखील ते पुढे म्हणाले.

आंदोलकांची मुख्यमंत्र्यांची भेट घालून देऊ

‘विषय गढूळ करायचा नव्हता म्हणून मी महिनाभर इथे आलो नाही. मात्र, आता पर्याय राहिलेला नाही. मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेल्या मराठा तरुणांचा आज आंदोलनाचा ३६वा दिवस आहे. इतके दिवस आंदोलन करुनही काही पर्याय निघाला नाही. मागील ३५ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मराठा तरुण आंदोलकांची आणि त्यांच्या वकिलांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर बैठक पार पडली. यानंतर आंदोलकांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजी राजे आझाद मैदानात आले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी नियुक्त्यांबाबत घोषणा न झाल्याने नाराजी दर्शवली आहे.

- Advertisement -

बैठकीत आंदोलकांच्या वकिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात विद्यार्थ्यांना नेमणूका द्याव्यात अशी मागणी केली. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांच्या जागेवर जे विद्यार्थी घेण्यात आले आहेत. त्यातील काही जणांना नोकरीत कायमस्वरूपी पदासाठी समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली असून याबाबत अजित पवारांनी देखील तत्काळ दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.


हेही वाचा – भारतात करोनाचा पहिला बळी?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -