मिलिंद आणि भिडेंना मी व्यक्तिशः ओळखत नाही – शरद पवार

खासदार शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी जे. एन पटेल आयोगासमोर चौकशी झाली. या प्रकरणी त्यांना आयोग आणि इतर वकीलांनी ही प्रश्न विचारले. या प्रश्नांना त्यांनी थेट उत्तरे दिली.

Sharad Pawar slams bjp leader said People are smart teach a lesson politicians when they make a mistake
जनता हुशार, राजकारणी चुकल्यावर धडा शिकवते, शरद पवारांचे श्रीलंका पाकिस्तानच्या अराजकतेवर प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी जे. एन पटेल आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहिले. या प्रकणी त्यांना आयोग आणि इतर वकीलांनी ही प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविषयी वर्तमानपत्रांमध्ये वाचल्याने मला माहिती आहे, मी त्यांना व्यक्तिशः ओळखत नाही, असा दावा त्यानी केला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणानंतर शरद पवार यांनी काही आरोप केले होते. त्यामुळे पवार यांना आता चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले आहे.

या चौकशीत शरद पवार यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याला त्यांनी थेट उत्तरे दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तुमचे घर हे केंद्रस्थानी होत? असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना मी केवळ कोरगाव भीमासाठी आलोय. मी त्यावेळी 16 वर्षांचा होतो. त्यामुळे इतके जुने मला काही आठवत नाही, असे ते म्हणाले. तर संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना तुम्ही ओळखता का? यावर त्यांनी मी त्यांच्याबद्दल पेपरमध्ये वाचले आहे, असे उत्तर दिले. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी वढू बुद्रुक याठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती स्थापन केली याची कल्पना तुम्हाला आहे का?, असा प्रश्नही शरद पवार यांना आयोगासमोर विचारण्यात आला. या प्रश्नावर मी प्रतिज्ञापत्रावर जे काही म्हटले तेवढेच मला बोलायचे आहे, असे उत्तर शरद पवार यांनी दिले. यावेळी कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेबाबत मला प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमधूनच कळले, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांना काही महत्वाच प्रस्न ही विचारण्या आले. या प्रश्नाला त्यानी थेट आणि स्पष्ट उत्तरे दिली. यासंदर्भात तेव्हा तुम्ही सरकारला काही सूचना केल्यात का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जेव्हा हा आयोग तयार करण्यात आला. तेव्हा मला येथे येऊन जबाब देण्याची नोटीस आली. त्यानुसार मी माझे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात एल्गार परिषदेबाबत पोलिसांनी केलेला तपास हा पोलीस खात्याला काळीमा फासणारा आहे या त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले असता एल्गार परिषदेला जी लोकं आलीही नव्हती त्यांच्यावरही केसेस दाखल झाल्यात. हे योग्य नाही. त्यामुळे मी त्याबद्दल बोललो असेन पण भीमा कोरेगावबद्दल बोललेलो नाही. या दोन्ही वेगळ्या घटना आहेत. असे शरद पवार म्हणाले.

काय आहे प्रकरण –

1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक चौकशी आयोग नेमला होता. दरम्यान, भिमा कोरेगाव प्रकरणी शरद पवार यांनी हा हिंसाचार शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे अॅड. प्रदीप गावडे यांनी या प्रकरणी पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी समन्स दिले होते..